✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.20जून):-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून काम करणारे वडगाव येथील चव्हाण हॉस्पिटलचे संचालक डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गगार राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजे गिरीश घोरपडे यांनी काढले. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कोरोना योद्धा सन्मान सोहळा कार्यक्रमा प्रसंगी श्री घोरपडे बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून राज्य परिवहन अधिकारी अशोकराव पवार, विश्वगामी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव रमेश देसाई, ह्युमनराईट्स प्रदेश अध्यक्ष संतोष जाधव, उद्योजक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश जाधव, पुणे जिल्हा सचिव नंदकुमार बोळे, पुणे शहर उपाध्यक्ष जयंत भोसले,विश्वगामी डॉक्टर संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. दिनेश बाऊस्कर, उत्कर्ष हायस्कूल च्या संचालक सौ. चव्हाण, राष्ट्रीय विश्‍वगामी समाजकार्य संघ पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रोहित राजे घोरपडे आदी उपस्थित होते.

डॉ. पृथ्वीराज चव्हाण, डॉ अजिंक्य चव्हाण यांनी करोना काळात उत्कृष्ट कामकाज केले त्याबद्दल त्यांचा व परिचारिका, वार्ड बॉय यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे व समाज कार्य संघाचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED