

🔸आशा व गट प्रवर्तक महिलांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.21जून):-आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांना दरमहा मानधन वाढवून द्या. किमान वेतन लागू करा.ग्राम पंचायत,अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्या प्रमाणे आरोग्य विभागात शासकीय नोकर भरतीत प्राधान्य द्यावे, कोविड काळात काम करताना आशा व गट प्रवर्तक महिलांना प्रतिदिन 500 रू.प्रोत्साहन भत्ता द्यावा गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांचा समावेश सूत्रीकरण करून कंत्राटी कर्मचारीचे वेतन द्या.यासह विविध मागण्यासाठी आशा व गट प्रवर्तक संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात 15 जून 2021 पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू आहे.परंतु सरकारने दखल घेतली नाही म्हणून महाराष्ट्र भर आमदार खासदार व मंत्री यांच्या घरावर मोर्चे काढून निवेदन देण्यात यावे असे आवाहन कृती समितीने केले आहे.
त्या अनुषंगाने आय टक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे ,गडचिरोली भाकप नेते देवराव चवळे, आय टक जिल्हा सचिव ऍड जगदीश मेश्राम, आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना जिल्हा सचिव ममता भिमटे यांच्या नेतृत्वात ख्रिस्तानंद चौक येथून दुपारी दोन वाजता अशा व गट प्रवर्तक यांचा विराट मोर्चा 20 जून 2021 रोजी ना. विजय भाऊ वडेट्टीवार मंत्री तथा पालकमंत्री यांच्या ब्रम्हपुरी येथील जनसंपर्क कार्यालय वर धडकला .त्या नंतर सदर मोर्च्याची दखल घेत स्वतः मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी मोर्चे करान समोर येऊन निवेदन स्विकारले आणि स्थानिक समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले व राज्य स्तरीय मागण्या संदर्भात मुख्यमंत्री सोबत संघटनेची लवकरच बैठक लाऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ.विनोद झोडगे जिल्हा सचिव ममता भिमटे,ज्योत्स्ना ठोंबरे, वर्षा घुमे,मंदिरा देवतळे,शारदा मानापुरे,सुनंदा मुलमुले , छबु मेश्राम,वनिता तीवाडे, शसिकला लाडे, माया मेश्राम रिना कोल्हे,विना मैंद , गट प्रवर्तक नाकाडे यांच्या सह जिल्हाभरातील हजारो आशा व गट प्रवर्तक उपस्थित होत्या.संप सुरूच असल्याने 26 जून 2021 रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर विशाल धरणे आंदोलन आयोजित केलेला आहे.सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मोर्चा दरम्यान श्री विनोद झोडगे यांनी केले आहे.