गंगाखेड मध्ये योग दिनानिमित्त कार्यक्रम

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी )

गंगाखेड(दि.21जून):-21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधत आमदार रत्नाकर गुट्टे, मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान तथा पतंजली योग समिती गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 जून ते 21 जून असे तीनदिवसीय भव्य योग शिबिराचे आयोजन शहरातील संत जनाबाई अन्नक्षेत्र गोदा तट या ठिकाणी करण्यात आले होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, ज्येष्ठ योगशिक्षक रमाकांत जोशी, योग प्रशिक्षक तथा पतंजली योग समिती परभणीचे जिल्हा प्रभारी निखिल वंजारे, पतंजलीचे सोशल मीडिया जिल्हा प्रभारी तथा योगशिक्षक गोपाल मंत्री,प्रसिद्ध व्यापारी सचिन महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. तीनदिवसीय योग शिबिरामध्ये आयुष मंत्रालयाने घालून दिलेल्या योग दिनाच्या प्रोटोकॉल प्रमाणे योग प्रशिक्षक निखिल वंजारे व डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित योग साधकांना यथोचित मार्गदर्शन केले. कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवर मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंग या सर्व नियमांचे पालन करत हे शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल वंजारे तर सूत्रसंचालन गोपाल मंत्री यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा सोळंके, हनुमंत लटपटे , विठ्ठल सातपुते, सोमेश्वर लाडे, सचिन कवटकवार ,भगवान मुंडे, अंकुश मदनवाड, संदीप कोटलवार , ह.भ.प. बाळु महाराज बहादुरे, राधाकिशन शिंदे, हनुमंत मुंडे, शिवाजी पवार, संभुदेव मुंडे, ज्ञानेश्वर कवठेकर, शिवाजी चौधरी, मुंजाजी सोळंके, रामेश्वर भोसले, जोशी बी.आर., राम चिलगर,रवि लांडगे, विशाल नाव्हेकर, रामलिंग कोरडे आदींनी प्रयत्न केले.