✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.24जून):-धानोरा तालुक्यातील पेंढरी क्षेत्रातील ग्रामपंचायत कामनगड येथील अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण सोहळा जिल्हा परीषद उपाध्यक्ष श्री मनोहर पाटील पोरेटी यांच्या हस्ते पार पडला. कामनगड येथील अंगणवाडी ही खुप जुनी कवेलु ईमारत असल्याने कोसळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणून अंगणवाडीतील लहान बालकांना, गरोदर महिला व कर्मचारी यांना धोकादायक असल्याने एका खाजगी ठिकाणी हलविण्यात आले.त्यामुळे सदर अंगणवाडी ईमारत नवीन बांधण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ती ईमारत मंजूर होऊन नवीन इमारत बांधण्यात आले.

या नवीन इमारतीचे लोकार्पण सोहळा श्री मनोहर पाटील पोरेटी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. विनोदभाऊ लेनगुरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. श्रीनिवास दुल्लमवार, कामनगड ग्रामपंचायतीचे सरपंच संजय गावडे, उपसरपंच रमेश वालको, माजी उपसरपंच धनिराम गावडे, माजी उपसरपंच श्री. छभिलाल बेसरा दुर्गापूर, सदस्य केजुराम गावडे, अस्मिता गावडे, कविता गावडे, ग्रामसेविका कोडापे मॅडम, गावभूमिया श्री. देवराव गावडे, गावपाटील श्री. रामजी गावडे, अंगणवाडी सेविका सानिका सरकार, मदतनीस सिंधु गावडे, शिक्षक हसन गेडाम सर, नागमोते सर, राजु गेडाम सर, मनिराम गावडे, सिताराम पदा, सुकलाल गावडे, शांताराम तुलावी व गावातील महिला, पुरुष व बालगोपाल उपस्थित होते.

गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED