🔸पोलिस आयुक्तकड़ें तक्रार – बड़तर्फ करण्याची मागणी

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

खापरखेडा(दि24जून):- विना हेलमेट दुचाकी वाहन चालविताना फोटो वीडीओ घेतल्याने त्या दोन्ही महिलां पोलिस कर्मचाऱ्यांनी तक्रार करण्यासाठी पुरावें म्हणून फोटो वीडीओ घेणाऱ्या त्या पत्रकारालाच वीडीओ डिलीट न केल्यास मारण्याची धमकी व शिव्या देवून त्यांचा मोबाइल हिस्काविन्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना नागपुर शहराच्या एलआईसी चौकात काल दुपारी घडली आहे .

तक्रारदार चंद्रभान उर्फ शेखऱ कोलते हे खापरखेडा येथील रहिवासी असून नागरिक हक्क संरक्षण या साप्ताहिक न्यूजपेपरचे उपसंपादक व क्राइम पत्रकार सुद्धा आहेत . काल दिनांक 24 जून 2021 , गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार कोलते हे एलआईसी चौकाच्या ट्रैफिक सिग्नल कडून दुचाकीने जात असताना त्यांना पोलिस खाकी वर्दीधारक दोन महिला पोलिस कमर्चारी हे स्कूटी नं – MH 40 AP 8502 आणि स्कूटी नं – MH 40 BU 4642 या दुचाकी वाहनाने हेल्मेट परिधान न करता (without helmet ) जातानां दिसले

हा प्रकार नियमबाह्य वाटले असता ट्रैफिक पोलिस विभाग नागपुर शहर यांच्या तक्रार प्रणाली साठी असलेल्या 90113 87100 या वाट्सअप मोबाइल क्रमांक वर पुरावे सहित तक्रार करण्यासाठी कोलते यांनी त्या दोन्ही दुचाकी वाहनाचा क्रमांक सहित मोबाइल द्वारे वीडीओ व फोटो घेतले . मोबाइल द्वारे फोटो वीडीओ घेतल्याने व कार्यवाहिच्या भीतिमुळे त्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी कोलते यांना रोकले आणि वीडीओ व फोटो त्वरित डिलीट करण्यास धमकावले . कोलतेनी त्यानां उपसंपादक व पत्रकार म्हणून आपला परिचय दिला तेंव्हा त्यातील एका महिलेने उद्धटपणे वागुन व ‘भाडित गेला पत्रकार ‘ अशे पत्रकारिताविषयी अपशब्द वापरून शिव्या दिल्या . सोबतच ‘ तो वीडीओ डिलीट कर लवकर , नाहीतर कनपटात मारीन ‘ अशी मारण्याची धमकी देत कोलते यांचा मोबाइल हिस्कावन्याचा वारंवार प्रयत्न केला व भरचौकात त्यांचा अपमान केला , कोलते यांनी त्या दोघांना ताई व मॅडम संबोधित केले आणि पुरावें साठी फोटो वीडीओ घेवून काही चुकीचे केले असेल तर माझी पोलिस स्टेशन मध्ये तुम्ही तक्रार करू शकता , अशे सांगितले . परंतु त्यांनी अर्वाच्च् भाषा वापरत पत्रकार कोलते सोबत भांडण केले.

*दोघांवर फौजदारी गुन्हा व बड़तर्फ करण्याची मागणी*

 

पोलिस विभागची खाकी वर्दी परिधान करून पोलिस विभागाचेच कायदे व नियमांचे उलंघन करने हे कृत्य सर्वता नियमबाह्य व बेकायदेशीर आहे , कायदे व नियम सामान्य जनता व अधिकारी कर्मचारी सर्वानाच समान असतात , म्हणून त्या दोन्ही महिला पोलिस कमर्चारी वर विना हेलमेट वाहन चालविने , पत्रकार व उपसंपादक सोबत वाद घालने, पत्रकारीतेच्या कामात अडथळा आनने, हुज्जत घालने , शिव्या देने, अपमान करने, मारण्याची धमकी देने प्रकरणी पत्रकार संरक्षण अधिनियम 2019 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावे , सोबतच पोलिस विभागच्या खाकी वर्दीचा दुरपयोग करून व नियमांचे उलंघन करीत पोलिस विभागाची प्रतिमा व शिस्त आम जनता व समाजासमोर मलिन करणाऱ्या त्या दोन्ही महिला पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस सेवेतुन तात्काळ बड़तर्फ करावे , अशी कोलते यांनी आपल्या तक्रारमध्ये पोलिस आयुक्तकड़ें मागणी केली आहे . सोबतच या दोन्ही महिला पोलिस कमर्चारी वर पोलिस आयुक्त यांनी त्वरित कार्यवाही न केल्यास किंवा कार्यवाहिशी असमाधानी असल्यास मुंबई उच्च न्यायालय , खंडपीठ नागपुर येथे फौजदारी याचिका दाखल करून दाद मागन्याचा इशारा सुद्धा पत्रकार कोलते यांनी दिला आहे .
दोन्ही महिला पोलीस कर्मचारी यांना पाचशे रुपये ई चलान दंड झाला आहे

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED