महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे जस्टीस पंत यांची घेतली भेट

    37

    ✒️नवी दिल्ली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नवी दिल्ली(दि.२५जून):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली आज शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे व तसेच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्टीस पी.सी.पंत यांची भेट घेतली व निवेदन सादर केले तसेच चंदीगढ येथे होणाऱ्या AlCOI च्या संमेलनासाठी निमंत्रण ही दिले.

    याप्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट मा.प्रकाश निधी शर्मा, संस्थेचे दिल्ली सचिव ॲडव्होकेट मा.हरजीत सिंग,  अभय निधी शर्मा व आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यात कोणावरही अन्याय झाल्यास खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे या प्रसंगी दिली.