रिपाई कार्यकर्ते यांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी स्टेट बँकेच्या फिल्ड ऑफिसर विरुद्ध गुन्हा दाखल

    43

    ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

    पुसद(दि.25जून):-केंद्र सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकडॉउन काळामध्ये नगर परिषद अंतर्गत फिरत्या किरकोळ विक्रेत्यांना दहा हजार रुपये अनुदान कर्ज योजना जाहीर केली होती या योजनेअंतर्गत प्रकाश देशमाने राहणार भिलवाडी इटावा पुसद यांनी स्टेट बँक ऑफ शाखा पुसद येथे आवश्यक संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून सहा महिने उलटले तरी संबंधित बँकेचे अधिकारी कोणत्याही प्रकारचे दाद देत नव्हते त्यामुळे 23 जून दुपारी अडीच ते तीन यादरम्यान रिपाई शहराध्यक्ष लक्ष्मण कांबळे वय 44 राहणार महावीर नगर हे स्वतः संबंधित पात्र योजनेच्या लाभार्थ्यांना घेऊन वरील प्रकरणाचा माहिती विचारण्यासाठी गेले असता यावेळी फील्ड ऑफिसर अमित सनकाळे यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देत व अश्लील भाषेत शिवीगाळ केली, याप्रकरणी शहर पोलिस स्टेशन पुसद येथे लक्ष्मण कांबळे यांच्या तक्रारीवरून ,अमित सनकाळे विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 294 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने अमित सन काळे यांची ग्राहका विरुद्ध अपमानास्पद वागणूक देत असल्या प्रकरणी अभद्र भाषेचा वापर करीत असल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी याकरिता बँकेचे मुख्य मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर ऑफिसरची बदली न केल्यास पुढील कार्यकाळात उपोषण व आंदोलन केल्या जाईल असे निवेदनात नमूद केले आहे.