🔹विचारांची शिकवण प्रामाणिकपणाचे दर्शन…

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभाग प्रतिनिधी)मो-8080942185

केज(दि.26जून):-सध्याच्या कलियुगात माणस फार बदलून गेलेली आहेत हे तर आपण रोजच्या जीवनात आणि घडणाऱ्या घटनेवरून सर्वजण पाहतच आहोत.आजच्या युगात लोकं स्वार्थी होऊन गेली आहेत. चांगल्या,वाईट गोष्टींचा विचारही कोणी करत नाहीये.माणुसकी सोडून लुबाडणाऱ्या अविचारी लोकांची भर समाजात पडत आहेत.एकमेकांस मदत करायचे तर सोडाच पण मोठं मोठ्या वस्तू किंवा पैसे सोडाच पण एक रुपाया ही कोणाला सापडला तरी कोणी तो परत करण्याच्या मनस्थितीत नसतो.पण समाजातील काही वैचारिक आणि प्रामाणिक असणाऱ्या लोकांमुळे माणुसकी अजून शिल्लक आहे आणि प्रामाणिक व निस्वार्थी लोकही समाजात आहेत हे दिसत.

असच एक प्रामाणिक पणाचे उदाहरण तालुक्यात पाहायला मिळाले ते म्हणजे वैचारिक चळवळीत मोठे योगदान असणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे.आंबेडकरी चळवळीतील काम करणाऱ्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीवर आणि प्रामाणिक विचारावर विचारधारेवर चालणाऱ्या भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस बालासाहेब जोगदंड ,भारतीय बौद्ध महासभेचे मार्गदर्शक तथा बौद्धाचार्य शिंदे व पत्रकार रंजित घाडगे हे सर्व पैठण येथील विद्रोही शाहीर मधुकर कदम यांचा वाढदिवसनिमित्त केज वरून पैठण येथे मोटारसायकल वरून जात असताना कुंबेफळ च्या रस्त्यावर एक अँड्रॉईड मोबाईल बोधाचार्य शिंदे यांना दिसला गाडी थांबवून बालासाहेब जोगदंड यांनी जवळ जाऊन पाहिले मोबाईल वर फोन येत होते.

त्यांनी ते आलेले कॉल स्वीकारले व मोबाईल आमच्याकडे आहे असे सांगितले त्याची विचार पुस केली तर तो नितीन बिमटे नामक मुलगा अंबाजोगाई येथील होता. त्या मुलाला भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य एस बी शिंदे,भारतीय बौद्ध महासभेचे ता सरचिटणीस बालासाहेब जोगदंड व पत्रकार घाडगे रंजीत यांनी त्या मुलास त्याचा मोबाईल परत करून आंबेडकरी चळवळीची विचाराधा जोपासून एक आदर्श निर्माण केला आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED