सलग ३५ वर्षे एसटी बसची सेवा करणारे श्री.मारूती काशीनाथ पोकळे

31

🔸एक हसातमुख व्यक्तीमत्व,सर्वांचे लाडके ” मामा “

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.29जून):-बेलगांव हे आष्टी तालुक्यातील एक राजकीय क्षेत्रत चर्चेत असलेले गाव.या गावात श्री.मारुती काशीनाथ पोकळे यांचा जन्म दि.४ जुन १९६३ साली झाला.शेतकरी कुंटुंबात जन्मलेले मामा कसेबसे दहावीपर्यत शिकले.घरात आईवडील आणि सात बहिणी असा परिवार आहे.महेश उर्फ मुन्ना आणि समीर उर्फ पप्पू असे दोन मुले व सौ.मनिषा दिपक आजबे (जामखेड ) ही मुलगी आहे.श्री.दिपक आजबे हे जावाई प्राथमिक शिक्षक आहेत.श्री.मारुतीमामा पोकळे यांच्या सुविद्य पत्नी सौ.कार्लींदाताई मारुती पोकळे आहेत.मामा ना खऱ्याअर्थाने आधार कुणी दिला असेल तर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.कालींदाताई यांनीच.त्या एक आदर्श गृहिणी,आदर्श माता,आदर्श पत्नी आहेत.पोकळेमामासारखा माणुस त्यांनी संसारात गुंतवून,आदर्श कुंटुंब घडविलेले आहे.

मारुतीमामा पोकळे यांची बसचालक म्हणुन दि.१० मे १९८६ रोजी प्रथम नेमणूक गेवराई बस आगारात झाली.तेथे फक्त वर्षभर नौकरी केली,त्यानंतर बीड येथे बसआगारात एक वर्षे नौकरी केली.त्यानंतर प्रवर्ग बदलुन आष्टी आगारात मँकेनिक म्हणुन बदलुन आले.सलग ३३ वर्षे आष्टी बस आगारात विनातक्रार सेवाकाल घातला.ते आता दि.३० जून रोजी सेवानिवृत होत आहेत.पोकळेमामा हे अष्टपैलु व्यक्तीमत्व आहे.यशस्वीतांच्या यशाचा
हेवा करणारे त्यांनी उपसलेल्या कष्टाच्या मजबुत पायाकडे दुर्लक्ष करतात.प्रत्येक यशस्वीताची एक कथा असते.सर्वचजण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले नसतात.आपल्या कार्यकर्तृत्व आणि जिद्दीच्या जोरावर ते यश मिळवितात.शांत,संयमी,कर्तबगार आणि संघर्षमय वाटचालीतुन यशाचे शिखर गाठणारे मारुतीमामा पोकळे आहेत.सुख समाधानाच्या ठेवा आपल्या स्वकर्तुत्वाने निर्माण करावयाचा असतो यासाठी त्याग आणि समर्पणाने इतिहास रचून समाजासाठी आदर्श उभा करायचा असतो यालाच जीवन म्हणायचे असते.

या विचारातून मारुतीमामा पोकळे यांनी सामाजिक,राजकीय जीवनात काम केलेले आहे.मारुतीमामा पोकळे हे मातृपितृ भक्त
तर आहेतच शिवाय रेणुकादेवीचेही निस्सीम भक्त आहेत.त्यांनी रेणुकाईदेवी मंदीर जिर्णोध्दारात पुढाकार घेतला होता.माहुरगडावरुन यात्रेनिमित्त आणण्यात येणाऱ्या ज्योतीत त्यांचा सहभाग व मदत असते.पोकळेमामा यांनी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेत तालुका,जिल्हा,विभागीय आणि राज्यपातळीवार विविध पदे यशस्वीपणे सांभाळली आहेत.नौकरी करीत असले तरीही आष्टी तालुक्यातील सर्व राजकीय नेते,पदाधिकारी यांच्याशी पोकळे मामाचे प्रेमाचे,मैत्रीचे संबध आहेत.

३५ वर्षाच्या सेवाकाळात लाभलेल्या अधिका-यात राजीव साळवे,दत्तात्रय पंढरीनाथ काकडे,बाळासाहेब गिरी,अविनाश देशमुख,केशव गव्हाणे,संजय निंबाळकर,दिनकर पवार,धर्मनाथ मुळे,राजेश जोगदंड,बाळासाहेब काकडे,तुकाराम राख,अशोक परदेशी,अशोक निंबाळकर यांच्यासह माजी शिक्षणीधिकारी विक्रम पोकळे,डॉ.दादासाहेब काकडे,अँड.आदिनाथ पोकळे,अँड.हनुमंत शिंदे,सेवानिवृत पीएसआय रावसाहेब पोकळे,सेवानिवृत पीएसआय हनुमंत पोकळे,भगवान विधाते,पत्रकार उत्तम बोडखे,दादासाहेब पोकळे (नाना),माजी सरपंच बन्शीभाऊ पोकळे,कैलास पोकळे,दिलीप पुढारी पोकळे,मोहन मुकादम पोकळे तर आष्टी शहरातील व्यापारी सुनिलशेठ मेहेर,राजेंद्र महाराज जोशी,संजयशेठ शिंगवी,महेश महाराज जोशी यांच्याशी घनिष्ठ मैत्री आहे.आष्टी आगारात सर्व कर्मचाऱ्यांचे पोकळेमामा मार्गदर्शक आहेत.आगारप्रमुख संतोष डोके व सर्व एसटी आगार आष्टी येथील कर्मचाऱ्यांनी सेवापूतीबद्दल अभिनंदन केले आहे.आष्टी शहरातील सर्व मित्र परिवाराच्यावतीने पोकळेमामा यांना सेवानिवृतीनिमित्त हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…!!!