हणेगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा

    46

    ?हणेगाव विभागाला विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही- अशोकराव चव्हाण

    ✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

    हणेगाव(दि.२९जून):- देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून यामध्ये काँग्रेस पक्षाने जितेश अंतापुरकर यांना पक्षाच्या राज्य सरचिटणीस पदावर नेमणूक करुन त्यांना उमेदवारी देण्याची इच्छा वर्तवून काँग्रेस पक्षाने सर्व ताकदीनिशी कामाला लागले असून त्यामध्ये काँग्रेसचे लोकनेते राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण स्वतः मतदारसंघाकडे लक्ष दिल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.

    हणेगाव येथे दिनांक २७ जून २०२१ रोज रविवारी अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रमुख पाहुणे माजी उच्चतंत्र शिक्षणमंत्री डी.पी.सावंत, आमदार अमर राजूरकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, मंगाराणी अंबुलगेकर जिल्हा परिषद अध्यक्ष नांदेड, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर माजी आमदार,मोहनअण्णा हंबर्डे आमदार नांदेड, गोविंदराव शिंदे नागेलीकर अध्यक्ष नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी, संजय बेळगे, मोगलाजी शिरशेटवार नगराध्यक्ष देगलूर, मिसाळे गुरुजी , ॲड, प्रीतम देशमुख अध्यक्ष देगलूर काँग्रेस कमिटी, दिलीप बदंखडके, जि ,प ,सदस्य हणेगाव रामराव नाईक जि.प.समाजकल्याण सभापती, मंगेश कदम मंचावर उपस्थित होते.

    यावेळी अशोकराव चव्हाण यांचे सत्कार ॲड.प्रीतम देशमुख, विजयसिंह देशमुख, प्रशांत देशमुख,दिलीप बंदखडके यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी डी.पी. सावंत,अमरनाथ राजूरकर, वसंतराव चव्हाण या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तर महिला म्हणून आलेल्या मंगाराणी अंबुलगेकर यांचे सत्कार प्रणिता दिलीप बदंखडके, जि.प.सदस्य यांनी केले.
    यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रितंम देशमुख व जि.प.सदस्य दिलीप बंदखडके यांनी हणेगाव विभागाच्या विकास कामासाठी अशोकराव चव्हाण यांच्याकडे मागणी केली.

    त्यामध्ये सिद्धेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ३० लाख रुपये, हजरत मियासाहेब वली यांच्या दर्गासाठी वीस लाख रुपये, हणेगाव येथे राष्ट्रीयकृत बँक मिळणेबाबत हणेगाव जि.प. शाळा संपूर्ण संरक्षण भिंतीसाठी ५० लाखाची मागणी,हणेगाव बस स्थानक ते ग्रामपंचायत ७०० मीटर लांबीचे ६० फूट रुंदीचा रस्ता व पथदिवे यासाठी ७० लाखाची मागणी, मुस्लिम समशानभूमी संरक्षक भिंतीसाठी व डांबरीकरण रस्ता यासाठी दोन कोटींची मागणी, शिळवणी आश्रम शाळा रस्ता पाचशे मीटर ग्रामीण मार्ग क्रमांक ५३ यासाठी एक कोटी ची मागणी अशा अनेक मागण्यांचे निवेदन ॲड.प्रीतम देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात अशोकराव चव्हाण साहेबाकडे ही मागणी केली व साहेब आपण जे उमेदवार देतील तो आम्ही एक मताने निवडून आणण्याची तालुका अध्यक्ष या नात्याने ग्वाही दिली.

    यावेळी अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात सर्व मागण्या मंजूर करण्याची ग्वाही देऊन महाविकास आघाडीचे हात बळकट करण्याचे आव्हान केले तर मी शब्दाला जपणारा व जगणारा माणूस आहे म्हणून देगलूर विकास कामाच्या बाबतीत नेहमी झुकते माप देण्याचा माझा विचार असतो असे सांगितले तर रावसाहेब अंतापूरकर यांचा उर्वरित कालावधी हा महत्त्वाचा असून तो आपला उमेदवार निवडून आणून विकास कामे पूर्ण करावे असे यावेळी म्हणाले. यावेळी स्थलांतरित करण्यात आलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्रितम देशमुख यांनी केले तर आभार दिलीप बदंखडके यांनी मानले. या कार्यक्रमाला अनेक विभागातील अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती तर यावेळी बंदोबस्तासाठी मरखेल पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी चोख बंदोबस्त लावला होता