प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने अनाथ मुलांना कपडे व मास्क वाटप

23

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नवी मुंबई(दि.30जून):-प्रेस संपादक व प्रत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने रिद्धी सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट देऊन १०० पेक्षा जास्त अनाथ मुलांना कपडे व मास्क वाटप करण्यात आले. सदर उपक्रम प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, मुंबई महिलाध्यक्षा अंजली देवा, विभाग अध्यक्ष हेमंत कांबळे यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.

यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुंबई महिला पदाधिकारी सौ. वैभवी सोकटे, सौ. वर्षा कळंगुटकर, सौ. अक्षता उमळकर, सौ. प्रमोदिनी सावंत, सौ. साक्षी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सलीम सोशल फांउडेशन अध्यक्ष सलीम भाई यांच्या वाढदिवसानिमीत्त अनाथ मुलांना बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर व मुंबई महिलाध्यक्षा अंजली देवा यांनी रिद्धी सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबईतील अनाथ मुलांची प्रेम, आपुलकी व मायेने विचारपूस केली असता मुलांनी आनंदाने उत्तरे दिली तर काही मुलांची भावना अनावर झाली.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे त्या तोडीस मुंबईत मुंबई पोलिसांना विशेष मदत, फुटपाथवरील कुटुंबांना अन्नधान्य वाटप, गोरगरिबांना जेवण, अन्नधान्य वाटप, कोविड जनजागृतीचे फलक असे विविध उपक्रम राबवित असल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नाव घराघरांत पोहचत असल्याचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर यांनी सांगितले तर मुंबई महिलाध्यक्षा अंजली देवा यांनी अनाथ मुलं व त्यांच्या पालकांच्या मुलाखती घेतल्या. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या या उत्कृष्ट कार्यामुळे महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.