देवस्थान इनामी जमिनी मध्ये सन 2000 ते 2021 पर्यंत झालेल्या बोगस खालसे व गैरव्यवहार रद्द करा – सय्यद सलीम बापू यांचे आमरण उपोषण सुरु

35

🔸लोकतांत्रिक जनता दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.30जून):- जिल्ह्यातील वक्फ मंडळ कार्यालय अंतर्गत येणाऱ्या देवस्थान इनामी जमिनी मध्ये सन 2000 ते 2021 पर्यंत झालेल्या बोगस खालसे व गैरव्यवहार रद्द करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांची सी.बी.आय चौकशी करण्यात यावी या प्रमुख मागणीला अनुसरून लोकतांत्रिक जनता दल च्या वतीने जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू आहे.उपोषणाला लोकतान्त्रिक जनता दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी आहेत.

सविस्तर असे की बीड जिल्ह्यामधील परळी विभागातील सिरसाळा येथील देवस्थानाची इनामी जमीन सर्व्हे नं .216, 237, 6, 7, 226, 263, 264, 265, 266, 267, 268, 269 विषयी तत्कालीन तहसीलदार साहेब परळी यांचे आदेश क्रं . 2015 / जमा -2 / कावि / दि .29 / 08 / 2015 व उपविभागीय अधिकारी परळी यांचे आदेश क्रं .2015 / जमा- / कावि / दि .27 / 07 / 2015 तसेच जिल्हाधिकारी साहेब बीड यांचे आदेश क्रं .2015 / इनाम / कावि / 383 दि .10 / 07 / 2015 व दि .07 / 08 / 2015 अनुसार संबंधीत जमीनीवर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती व फेर क्रं .3475 घेवून प्रतिबंधक कार्यवाही अनुसरण्यात आली होती . परंतू सध्याचे उपविभागीय अधिकारी परळी यांनी तहसीलदार , मंडळ अधिकारी व तलाठी तसेच भूमाफियांशी संगणमत करुन वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानता लॉकडाऊनचा व कायद्याचा दुरुपयोग करुन दि .09 / 03 / 2021 रोजी बेकायदेशीर निर्णय घेवून संबंधीत प्रतिबंधक उठविण्यात आले आहे.हे बेकायदेशीर असून परळी येथील उपविभागीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.

तक्रारदार यांना कसलीच माहिती न देता लॉकड़ाऊन च्या काळात सर्व कामकाज बंद असतांना हे बेकायदेशीर निर्णय घेण्यात आलेला आहे .त्याच प्रमाणे अर्जदार सय्यद सज्जाद सय्यद गणी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी , तहसील कार्यालय परळी व तलाठी सज्जा यांच्याकडे आदेशाची नक्कल मागणी केल्यास अपीलची तारीख होवून गेल्यावर नक्कल देण्यात येईल अन्यथा तुला जेल मध्ये टाकण्यात येईल अशी धमकी दिली . संबंधीत इनामी जमीनीची राज्यपत्रावर इनाम म्हणून नोंद असून सुध्दा सदरील निकालामध्ये इनाम दिसून येत नाही असे उल्लेख केलेले आहे व या जमीनीचे वाद वक्फ न्यायालय औरंगाबाद येथे चालू असून तरी पण असे चुकीचे निकाल उपविभागीय अधिकारी परळी यांनी दिलेला आहे.सध्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये देवस्थानाच्या इनामी जमीनीची व अधिकाऱ्यांची हेच परिस्थिती आहे .

सन 2000 ते 2021 पर्यंत झालेले सर्व बेकायदेशीर बोगस खालसे रद्द करून संबंधित दोषी अधिकार्‍यांची सी.बी.आय.चौकशी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू आहे.उपोषणात लोकतान्त्रिक जनता दलाचे पठाण अमरजान,सय्यद सज्जाद,शेख महेमुद,शेख वसीम ( सामाजिक कार्यकर्ता ),शेख इलियास,एजाज इनामदार रावसाहेब शेळके, एकबाल काजी सह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी आहेत.