मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आपदग्रस्ताच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण

25

🔹बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे यांच्या हस्ते वितरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.1जुलै):-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कल्याण निधीअंतर्गत पारडी येथील हिना मेश्राम यांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे यांच्या हस्ते ब्रम्हपुरी येथील बँकेच्या शाखेत करण्यात आले.पारडी येथील नितेश मेश्राम (वय ३०) हे हमाल म्हणून काम करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. मे महीन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली. तेव्हा त्यांचा १२ मे २०२१ रोजी उपचाराअभावी मृत्यू झाला होता.

त्यांच्या पश्चात पत्नी व ३ वर्षाची मुलगी आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आता त्यांचे कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले. याची माहिती बँकेच्या संचालक मंडळाला होताच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या पुढाकाराने सदर कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.सदर धनादेशाच्या वितरणप्रसंगी मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, बँकेचे विभागीय अधिकारी महेंद्र मातेरे, सी.डी.सी.सी. बँक ब्रम्हपुरी शाखा व्यवस्थापक संजय वणवे यांची यावेळी उपस्थिती होती.
—————————————-

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कँन्सरग्रस्त,हार्ट अटँक, गंभीर दुर्धर आजार या रुग्णांना उपचारासाठी ४० हजार रुपये तर साप,विंचु चावून, वीज पडून मृत्यू झालेले, धानाचे पुंजणे जळालेल्या नागरिकांना आर्थिक मदतीचा आधार दिला जातो असे यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे यांनी सांगितले.