तांदळाने भरलेला पलटला ट्रक-जीवितहानी नाही

24

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.१जुलै):-रस्त्याचे कडेला असलेल्या उतारामुळे तांदळाने भरलेला ट्रक पलटल्याची घटना आज गुरुवार रोजी सकाळी स्थानिक नंदोरी रोडवर घडली. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी घडली नाही.प्राप्त माहितीनुसार वाहक चंदू काळे हा ट्रक क्रमांक एमएच-३२ ६५९६ ने अर्जुनी मोरगाव येथून अंदाजे २० टन तांदूळ घेऊन हिंगणघाट शहरात पोचला, शहरात नंदोरी मार्गाने प्रवेश करीत असतांना रोडच्या बाजुला आसलेल्या उतारावर सदर ट्रक पलटला,यात यावेळी सुमारे ४०० बोरी (२० टन) तांदूळ होता.

सदर घटना संत तुकडोजी वार्ड येथून नंदोरीकड़े जाणाऱ्या राज्य महामार्गावर घडली.या भागात रस्त्याचे कडेला मोठा उतार असून येथून चंद्रपुर जाण्यासाठी ट्रक तसेच खाजगी वाहनांची मोठी वर्दळ असते,परंतु या भागात रोडसाइड फिलिंग न केल्याने रोडला लागून मोठा उतार आहे.यामुळे येथे यापुर्वीसुद्धा अपघात झाले आहेत.स्थानिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याचे कडेला असलेल्या उतारावर रोडसाइड फिलिंग करावे,अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.