धनज येथे कृषी संजीवनी मोहीमेचा समारोप

43

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)मो:-8806583158

धनज(दि.1जुलै):- येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते वसतंराव नाईक यांची १०८ वी जयंती प्रज्ञा सुर्य अभ्यासिका स्टडी रुम मध्ये साजरी करण्यात आली. शेतकरी हा जगाच्या पोशिंदा आहे त्याचा शेतिला बारामाही पाणी संकरीत बियाणे पुरवून शेतीचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्यभर झटणारे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषीदिन म्हणून साजरी करण्यात येते.श्री दादासाहेब भुसे मा.मंत्री कृषी महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून कृषी संजीवनी मोहीम दिनांक २१जून ते १ जुलै २०२१ या दरम्यान राबविण्यात आली. या मोहीमेचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ नागरिक जहांगीर मियाँ देशमुख होते. या कार्यक्रमास तलाठी जी.एस.मोळके, सचिव बि.डी.भांगे, कृषी सहाय्यक एस.एस.परतवाड,कृषी पर्यवेक्षक आर.एन शिंदे, सोमनाथ जाधव कृषी सहाय्यक पिंपळदरी, देवानंद पाचपुते, संजय झाटे, दिलीप वाळके, गौतम ढोबळे, कनिकनाथ गुव्हाडे, बापुराव धनवे पोलिस पाटील, प्रकाश आमले, महादु असोले, प्रकाश डोगंरे, बालाजी मोडक, रामराव बोबंले, संभाजी जोगदंडे, हरी वाळके, गहेनाजी पठाडे, रघुवीर जाधव, बंडू आमले, काशिनाथ डाखोरे कृषी मित्र मोहदरी, आदी शेतकरी व गावकरी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एस.परतवाड यांनी केले. आर.एन.शिंदे कृषी पर्यवेक्षक यांनी सोयाबीन लागवडीचे ,बिजप्रक्रिया तंत्रज्ञान, महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल जोगदंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन चरण भाऊ डोगंरे यांनी केले.