कोरोना सारख्या महामारी च्या विळख्यात अडकलेल्या कृषीच्या विद्यार्थ्यांची फी पूर्णतः माफ करा- आकांक्षा शेळके

27

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.2जुलै):-संपूर्ण देश कोरोना सारख्या जागतिक नैसर्गिक महामारीशी सामना करत आहे यामध्ये प्रामुख्याने समाजातील प्रत्येक घटकांचे मोठ्या प्रमाणावर प्रत्येक ठिकाणी नुकसान झाले आहे व आज ही होत आहे आणि ही एक नैसर्गिक आपत्ती आहे असेही सरकारने जाहीर केले आहे व अशा प्रकारच्या प्रत्येक नैसर्गिक आपत्ती च्या वेळी प्रामुख्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर भरकटला जातो हे आपणांस चांगलेच ठाऊक आहे. तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रमात शिक्षण घेणारा विद्यार्थी हा प्रामुख्याने शेतकरी कुटुंबातूनच असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक परिस्थिती ढासळल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरणे शक्य नाही.

याच पार्श्वभूमीवर अकृषि विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना वार्षिक फी मध्ये सवलत देण्यात आली आहे परंतु कृषी विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने विद्यार्थ्यांना अन्याय झाल्याची जाणीव होत आहे.त्यामुळे सदरच्या नैसर्गिक आपत्ती चा विचार करून विद्यार्थी हितासाठी संपूर्ण परीक्षा शुल्क फी माफ करण्याचा निर्णय आपल्या स्तरावरून घेण्यात यावा अशी मागणी मी महाराष्ट्र विकास विद्यार्थी आघाडीच्या वतीने विजय खुपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आकांक्षा शेळके यांनी केली आहे.