राठोड फाउंडेशन कडून कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर

19

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.3जुलै):-छत्रपती शाहू महाराजांच्या शाहू नगरी कोल्हापूर मध्ये सांगली येथील ज्ञानदीप अकॅडमी व राठोड फाउंडेशन यांच्याकडून कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, पोलीस, समाजसेवक, पत्रकार यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.या पुरस्काराचे वितरण कोल्हापूर येथे होणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पुरस्कार वितरणाची तारीख नंतर घोषित केली जाईल.

या पुरस्कारासाठी कोरोना काळातील मागील दोन वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न व पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जातो. यामध्ये बी.ए.पाटील(माजी संचालक भोगावती साखर कारखाना), बाबासाहेब देवकर (माजी सदस्य जिल्हा परिषद), राजेंद्र सूर्यवंशी (माजी सभापती करवीर), शारंगधर देशमुख (नगरसेवक को.म.न.पा) संग्राम देसाई (सदस्य भुदरगड पंचायत समिती), रविश पाटील (माजी उपसभापती राधानगरी), मोहन धुंदरे (सामाजिक कार्यकर्ते), सरदार पाटील(अध्यक्ष मानवाधिकार), राहुल खाडे(उद्योजक), डॉ.सुमित्रा भोसले (महिला उद्योजिका), दत्तात्रेय पाटील (उद्योजक), डॉ. नितीन कुमारतीवाटणे, डॉ.असलेशा चव्हाण, धनाजी देसाई (पत्रकार), बरकतभाई पन्हाळकर (पत्रकार), जावेद देवडी(पत्रकार),अक्षय थोरवत(पत्रकार), निलेश जाधव (पत्रकार पुण्यनगरी), शिवराज लोंढे (पत्रकार लोकमत), प्रा. उत्तम पाटील (पत्रकार पुढारी) प्रकाश नलावडे (पत्रकार सकाळ), स्मिता लंगडे (उद्योजिका) आकाशी लाड (सरपंच पिरवाडी), जितेंद्र यशवंत(माजी सरपंच गडमुडशिंगी), राहुल कोळी (पोलीस), संजय पाटील (पोलीस), लक्ष्मण कोळी (शाखा अभियंता सा.बा.पन्हाळा) सुभाष चौगुले (सामाजिक कार्यकर्ते), सविता पाटील (शिक्षिका), नंदकुमार लोखंडे (सामाजिक कार्यकर्ते), भगवान गुरव(सामाजिक कार्यकर्ते), विजय भोसले (आम आदमी रिक्षा चालक संघटक), अमर चौगुले (महसूल विभाग पन्हाळा), पुरुषोत्तम ठाकूर(तलाठी), कृष्णात पाटील (स्वयंसेवक) आदी दिग्गज मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यासाठी सरपंच सेवा संघ पुणे विभाग समन्वयक सुरेश राठोड (पत्रकार) यांचे सहकार्य लाभले. हे सर्व मान्यवर आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत अनेक माध्यमातून निस्वार्थ समाजाची सेवा करत राज्यभरातील विविध भागात कायम कार्यरत असतात. ग्रामविकासात भरीव कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवी, राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या कार्याचा आढावा घेऊन कोरोना काळात मोलाचे योगदान देतात. याबद्दल राठोड फाउंडेशन सर्वांचा आभारी आहे. व अशीच आपली भरभराटी हो, सदर आपले काम प्रेरणादायी आहे. अशी माहिती राठोड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश राठोड यांनी पत्राद्वारे दिली. सर्व डॉक्टर पोलिस स्वयंसेवक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यभरातून शुभेच्छा येत आहे.