भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित करून महाविकास आघाडी सरकारने केली हुकूमशाही- महेश देवकते

25

🔸तहसीलदार यांना निवेदन सादर

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.6जुलै):- ओ.बी.सी.आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित करून महाराष्ट्र शासनाने हुकूमशाही केली आहे.महाराष्ट्र सरकारचे हे वर्तन दडपशाहिचे असून केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन व त्यातही विरोधकांना बोलू न देणे.
हे हुकुमशाहिचे धोरण असून या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा महामंत्री महेश देवकते,उपाध्यक्ष केशवराव गिरमजी, तालुका महामंत्री दत्ताजी राठोड, तुकाराम वरलावड यांच्या नेतृत्वात तहसीलदार जिवती यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले,

यावेळी बोलताना महेश देवकते म्हणाले की अधिवेशनाच्या नावाने चाललेला हा गोंधळ तमाम महाराष्ट्राचा अपमान असून अश्या प्रकारे सरकार सूडबुद्धीने राजकारण करत असून या सरकारच्या या लोकशाही व ओ.बी.सी.विरोधी धोरणाचा आम्ही तिव्र निषेध करीत असून हे सरकार त्वरित बरखास्त करावे.

अशी मागणी यावेळी *उपसभापती महेश देवकते* यांनी केली.अन्यथा तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा दिला..

यावेळी उपसभापती महेश देवकते यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष केशवराव गिरमजी भाजपा तालुका महामंत्री दत्ता राठोड,भाजप तालुका सचिव तुकाराम वरलावड, भाजपा जिल्हा कार्यकरणी सदस्य गोपीनाथ चव्हाण,सरपंच पुंडलिक गिरमजी,भाजयुमो उपाध्यक्ष संतोष जाधव,भाजयुमो उपाध्यक्ष डॉ.बबन वारे,माधवराव निवळे, नामदेव सलगर,बुध्दाजी मेश्राम, बन्सी जाधव,विठ्ठल चव्हाण, सुनील शेळके,व्यकटी कोतांबे, ईश्वर आडे,विनायक राठोड, अनिल कांशीराम राठोड, मनमंत वारे,बळीराम राठोड, शिवाजी राठोड, अशोक देवकते, सचिन बाबू राठोड, प्रेमसिंग राठोड,प्रफुल मडावी,आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.