आमदारांचे निलंबन प्रकरणी हिंगणघाट येथे भाजपाने केला जाहिर निषेध

106

🔹राज्यपालांकड़े केली राज्य सरकार बरख़ास्त करण्याची मागणी

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.६जून):-राज्य विधानसभा अधिवेशनाचे दरम्यान
भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांना निलंबित केल्याचे प्रकरणाचे पडसाद तालुक्यातसुद्धा उमटले असून भारतीय जनता पक्षाचेवतीने आज दि.६ रोजी महामहिम राज्यपालांचे नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना निषेधात्मक निवेदन देण्यात आले.यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री किशोर दिघे,तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे,तालुका महामंत्री विनोद विटाळे,माजी पं.स.सभापती प्रभाकर बरडे,सरचिटणीस तुषार आंबटकर,गणेश उगे,सरपंच नितीन वाघ, येनोरा येथील सरपंच श्री. योगेश बोंडे, भागेश देशमुख, विक्की राऊत इत्यादि उपस्थित होते.

ओ.बी.सी. आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांना अन्याय्य पद्धतीने निलंबित करून लोकशाहिची गळचेपी करणाऱ्या या महाविकास आघाडी सरकारचा निवेदनाद्वारे निषेध करण्यात आला असून याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडी सरकारविरोधी निषेधात्मक जोरदार नारेबाजी करण्यात आली.

महाराष्ट्र सरकारचे हे वर्तन तद्दन दडपशाहिचे असून केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन व त्यातही विरोधकांना बोलू न देणे हे हुकुमशाहिचे धोरण असून अधिवेशनाच्या नावाने चाललेला हा तमाशा तमाम महाराष्ट्राचा अपमान असल्याचे निवेदनात म्हटले आहे.सरकारच्या या कृतीचा तिव्र निषेध करीत राज्यातील सरकार त्वरित बरखास्त करावे अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली.