परिवार जोडो संपर्क अभियान

40

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7जुलै):-समाजात कौटुंबिक कलहाचे प्रकार फार वाढत आहे.पत्नी कायद्याचा गैरवापर करून,कायद्याचा धाक दाखवून पती व सासरच्या मंडळींना वेठीस धरीत आहे.त्यामुळे अनेक परिवार पीडित आहे.परिवार बचाव संघटना चंद्रपूर कडून आपला परिवार कसा वाचविता येईल या करिता परिवार जोडो अभियान राबविण्यात येत आहे.या कार्यात संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर,सचिव सुदर्शन नैताम,ऍड सारिका संदूरकर,ऍड धीरज ठवसे, सचिन बरबतकर,नितीन चांदेकर,गंगाधर गुरनुले, विजय ठाकरे,स्वप्नील गावंडे,किशोर जांपालवर,रवी बोढे, पिंटू मुन,राजू कांबळे,स्वप्नील सुत्रपवार,अमोल कांबळे.आदी उपस्तीत होते.

संयुक्त कुटुंबाचा काळ अगदी आनंदात गेला,आता विभक्त कुटुंब पद्धती आली,यात कौटुंबिक वाद पराकोटीला जात आहे कारण या कुटुंबावर वाडीलधाऱ्यांचा धाक राहिला नाही,त्यांचे वजन राहिले नाही नवीन विवाहित जोडी सैराट झालेली आहे.पासच्यात्य संस्कृतीचे अनुकरण करून विनाशाकडे जात आहे,त्यामुळे विभक्त कुटुंब निराधार झाले.यात मोबाईल मुख्य भूमिका वठवीत आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे संशयवृत्ती वाढून कुटुंब तुटत आह,घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे,वाढते घटस्फोट समृद्ध समाजासाठी घातक ठरत आहे,पती पत्नीच्या भांडणात मुलांचे भविष्य अंधकारमय होत आहे.

पुरुषयांच्या माता पित्यांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येत आहे,घरातील भांडणामुळे भाऊ वहिनी,बहीण भाऊजी,आई वडील,नणंद भावजय कुटुंबात मधुर संबंध कटू होत चालले आहेत.कुटुंबात कलह निर्माण होण्याचे कारण आर्थिक,शारीरिक,लैंगिक,राजकीय असू शकते,या शुल्लक कारणावरून कुटुंब उद्धवस्थ होत आहे,नवऱ्याला,जावयाला सरळ करू या अविर्भावात राहून महिला कायद्याचा खुलखुळ्या सारखा गैरवापर करून हस्त्या खेळत्या परिवाराला नरक यातना भोगावयास लावतात.

कौटुंबिक वादात सासर व माहेर दोन्ही अधोगतीला जात आहे,समाज व कुटुंबाचे नुकसान होऊ नये याकरिता पती पत्नी,सासर माहेर यांच्यात कसा समन्वय घडवून आणता येईल दोन्ही पक्षाचे समुपदेशन करून परिवारात स्नेह व आनंद निर्माण व्हावा या करिता भारतीय परिवार बचाव संघटना चंद्रपूर कडून परिवार जोडो संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.संघटनेचे सर्व सदस्य या सामाजिक कार्यात स्वयंपूर्तीने सहभाग घेत आहे.