अंबाजोगाई मध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या डेंग्यू चिकुनगुनिया साथ थोपण्यासाठी तात्काळ वार्डनिहाण फवारण्या कराव्यात -गोविंद मस्के

30

🔸वंचित च्या वतीने अंबाजोगाई नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई सर्कल प्रतिनिधी)मो:-97634 63407

अंबाजोगाई(दि.7जुलै):-आज वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई च्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी अंबाजोगाई यांना अंबाजोगाई शहरात सध्या डेंग्यू आणि चिकन गुणियाची साथ सुरू असल्या कारणाने तात्काळ जंतूनाशकाची वार्डनिहाय फवारणी करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.

या वेळेस वंचित बहुजन आघाडी चे तालुका प्रवक्ता गोविंद मस्के,गायरान हक्क अभियानाचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वरजी जोगदंड तालुका महासचिव उमेश शिंदे, पुरोगामी संदेश व वंचितनामा चे जिल्हा प्रतिनिधी तथा वंचितचे केज तालुका महासचिव नवनाथजी पौळ,सचिन वाघमारे,कपिलजी शिनगारे,मारुती लोखंडे,काशिनाथ धोत्रे.मारुतीराव लोखंडे उपस्थित होते.