मान्यवरांच्या उपस्थितीत कवीसंमेलन, पुस्तक प्रकाशन व ग्रंथतुला सोहळा संपन्न

32

✒️परभणी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

परभणी(दि.7जुलै):-श्री. मयुर जोशी लिखित ‘भावस्पर्शी मयूरविचार’ ललितसाहित्य संग्रह आणि ‘यथार्थ’ या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हा पुस्तक प्रकाशन सोहळा अत्यंत आगळ्यावेगळ्या स्वरूपात संपन्न झाला. लेखक तथा कवी श्री मयुर जोशी यांच्या नूतन गृहाच्या ‘वास्तुशांतीचे’ औचित्य साधून मातृत्व-पितृत्वाचा सन्मान करण्यासाठी व वाचन संस्कृती जोपासण्यासाठी जोशी (पाचलेगावकर) परिवारातर्फे आपल्या आई- वडिलांची ( श्री. मधुकरराव गजाननराव जोशी व सौ मालतीबाई मधुकरराव जोशी यांची) ग्रंथतुला करण्यात आली.

या कवीसंमेलन, पुस्तक प्रकाशन व ग्रंथ तुला सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध कवी तथा गीतकार श्री नारायण पुरी सर, सुप्रसिद्ध किर्तनकार श्री ह. भ. प. बाळू महाराज गिरगावकर, हेडगेवार हॉस्पिटलच्या कार्डियाक विभागाचे प्रमुख तथा सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. महेश देशपांडे, जि.प हिंगोलीचे शिक्षणाधिकारी श्री संदीपकुमार सोनटक्के साहेब, उपनगराध्यक्ष श्री बाळासाहेब भांबळे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष श्री बाळासाहेब काजळे, सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ दुर्गादास कान्हडकर, प्रा. विजय घोडके सर, पं. स औंढा नागनाथचे गटशिक्षणाधिकारी श्री काळे साहेब, केंद्रप्रमुख श्री गोरे साहेब व श्री शेळके साहेब, गझलकार श्री रत्नाकर जोशी, गीतकार श्री शंकर माने, कवयित्री सौ. ज्योती महाजन, कवी अंबादास घाळगीर, सुप्रसिद्ध किर्तनकार श्री ह भ प दीपक महाराज जोशी पांगरेकर ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.

उपस्थित सर्वच मान्यवरांनी श्री मयुर जोशी यांच्या लेखनाचे व व्यक्तिमत्त्वाचे भरभरून कौतुक केले. त्यांचे सर्व लेख, ललितसाहित्य, कथा, कविता अत्यंत हृदयस्पर्शी असतात असे सांगितले. वास्तुशांती सारख्या घरगुती कार्यक्रमात कवीसंमेलन, पुस्तक प्रकाशन व ग्रंथतुला यासारखा वैविध्यपूर्ण सामाजिक उपयुक्ततेचा कार्यक्रम आयोजित करून जोशी (पाचलेगावकर) परिवाराने समाजापुढे नवीन आदर्श ठेवला आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक परिवाराने आयोजित केले पाहिजेत. यासारख्या कार्यक्रमातून मात्यापित्यांच्या सन्मान करणे… व वाचन संस्कृती जपणे हा संदेश मिळतो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री राधाकृष्ण चांदजकर, श्री शंकर पुंड, श्री प्रशांत हिप्परगे, श्री माधव जोशी, श्री अनिरुद्ध जोशी, श्री योगेश जोशी, श्री शंतनु जोशी, श्री प्रवीण जोशी यांनी मेहनत घेतली.