अवघाची विश्व विकोनी त्याशी दिला, तरी त्याने प्राण वापस नाही केला

25

काही काही वाक्य हे काल्पनिक असले तरी सत्यात मोडताना दिसतात, त्याचंच उदाहरण म्हणजेच सदरील ओळ, अवघाची विश्व विकोनी त्याशी दिला तरी त्याने प्राण वापस नाही केला. आपण आपल्या जीवनात कधी कधी असंख्य त्रासनी गुरफटल्या जातो अनेक क्षेत्रात अनेकदा अनेकांनवर हे संकट येत आयुष्यात कोणत्या वळणार कधी काय होईल हे सांगन कठीणच आहे. मानसिक ताण तणावं व त्याचे विपरीत परिणामयावर ते अवलंबून राहतं, जीवन जगत असतांना प्रत्येक जन हा मनात एक आशा अपेक्षा स्वप्न ठेऊन जीवन जगत असतो, शेतकऱ्यांच स्वप्न असतं त्याचं पिक चांगलं यावं, विध्यार्थी यांचे स्वप्न असते अभ्यास करून पास व्हावे चांगले मार्क्स यावेत, नोकरदाराचे स्वप्न असते काही तरी नवीन खास करून बॉस कडून प्रोमोशन करून घ्यावं, दोन प्रेमीना वाटते समाजाचे बंधन नसायला हवे होते अनेकांचे अनेक स्वप्न राहतात काहींची पूर्ण होतात तर काहींची अपूर्णच राहतातपण कोणाची आशा मात्र इथे संपत नाही मला हे मिळालं,मी आता ते मिळवायला हवं यासाठी सतत कोणी ना कोणी धपडत असते.

आयुष्यात अशा काही विपरीत घटना घडून जातात, ज्या आपल्याला वेगळ्या वळनावर नेहतात, बरेच दा शेतकरी आत्महत्या करतांना दिसतो शेतकरी आत्महत्याचे प्रकरणे वर्षात सेकडो घडतात, का बर करायची आत्महत्या? का बरेच जणांचे असं मत येत की तो शेवटचा पर्याय आहे, आत्महत्या का करतात शेतकरी कर्जापायी, विध्यार्थी नोकरीसाठी, प्रियकर प्रियेसाठी,उदयोजक बिजनेस मध्ये लॉस आल्यावर यात काही तुरळीक प्रकरने वगळले की, आत्महत्या ही पैस्याशी निगडीत दिसते निसर्गाचा कोप व सावकाराचे कर्ज झाले म्हणून शेतकरी त्याचं जीवन संपवतो, खुप काही स्वप्न पहिलेले असतात पण योग्य भरती किंवा मुबलक अशा जागा नसल्याने विध्यार्थी आत्महत्या करतो, त्यात आरक्षण नसल्याने शिक्षण घेत असताना अफाट लागणारी फीस इत्यादी कारणे हे पैस्याशी निगडित दिसून येतात, पण कधी विचार केला आपल्याला मिळालेलं आयुष्य किंवा हा मानव जन्म याचं मूल्य काय आहे की यांची किंमत काय आहे.

मग का या धरतीवर जन्मला आलोत ते सुदंर असं आयुष्य जगण्यासाठी ते ही काही मर्यादित कालावधी साठीच मग आत्महत्या करून का तो कालावधी संपवायचा, अरे लाख रुपये कर्जपायी आत्महत्या करतायेत शोभतं कारे तुम्हाला हे, तुमची किंमत काय आहे हे मातीत मिसळल्यावर मोजता ही येत नाही लाख काय करोड काय अख्या विस्वाची किंमत एकत्र करून जरी कोणाला दिली तरी तो तुम्हाला परत आणू शकणार नाहीये एवढं हे अमूल्य जीवन का संपवायाचं?नोकरीपायी, कर्जपायी, प्रेयसीसाठी प्रेमात धोका झाला म्हणून आत्महत्या करतांना अनेक घटना दिसून येतात, काही व्यक्ती साठी ही का? अख्या विस्वात तिचं एकटी व्यक्ती का, या विस्वासात सर्व काही मिळत, नोकरी पैसा प्रियसी, पण जन्म देणारी आई नाही, अन आईच्या दुःखासासाठी कोणी आत्महत्या केली म्हणून आज एक ही घटना नाही, मग प्रियकर प्रियसी साठी का संपवायाचं जीवन इथे सर्व घटनाना पर्याय आहे, नोकरी नाही मिळाली म्हणून भाकरी भेटत नाही असं थोडंच आहे, प्रियकर प्रियसी, सोडून गेलं म्हणून आयुष्याला काही फरक पडणार नाहीये, यंदा शेती पिकली नाही म्हणून कर्जपायी जाणं हा पर्याय नाहीये, यातून मार्ग निघेल, नोकरीं साठी आत्महत्या करू नका पैसा कमवून चांगली लाईफ जगणं किंवा समाज सेवेसाठी अथवा आई बाबाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी हाच पर्याय नाहीये, हे विश्व आहे यात अनेक पर्याय व अनेक मार्ग आहेत, पण आत्महत्या करून जीवन संपवलं तर हे विश्व ही काही उपयोगी पडणार नाही.

✒️लेखक:-अंगद दराडे(माजलगाव बीड)मो:-8668682620