१४ जुलै रोजी पंचायत समिती तथा ग्रामसेवक युनियनच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित

28

✒️सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.10जुलै):- पंचायत समिती चिमूर तथा ग्रामसेवक युनियनशाखा चिमूरचे वतीने 14 जुलै रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.संपूर्ण जग आज कोरोना महामारीने होरपडले आहे. कित्येक जीव गेल्याने कुटूंबे उघड्यावर पडली आहे. माञ अद्यापही कोरोना रंग बदलवून हसतोय व आपण सक्षमपणे त्याचा मुकाबला करतोय माञ कोरोना दहशत संपलेली नाही. प्रत्येकांनी स्वतःला सुरक्षित ठेवत परिवाराचे रक्षण करणे हा अत्यावश्यक सेवेचा भाग असल्याचे चिञ आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत.

अश्या परिस्थितीत रुग्नांना आवश्यक रक्त पुरवठा रक्तपेढीत असणे आवश्यक आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने जनतेला रक्तदान करण्याचे आव्हाहन सुद्धा केले आहे. कोरोना लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी रक्तदान करुन माणुसकीचे नाते जपत प्राण वाचवू शकतो. पंचायत समिती चिमूर तथा ग्रामसेवक युनियन द्वारा एक खारीचा वाटा म्हणून “जगण्याला बळ देणारा” उपक्रम मा.जिल्हा परिषद तथा पंचायत समिती पदाधिकारी यांचे मार्गदर्शनात दिनांक 14 जुलै रोजी रक्तदान शिबीर आयोजित केलेले आहे.

त्याकरिता ईच्छुकांची नोंदणी होणे अभिप्रेत आहे. करीता आपल्या नावाची नोंदणी याखाली नमूद क्रमांकावर करावे ही आग्रहाची विनंती श्री.संजीव ठाकरे (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा चंद्रपूर) यांनी केली आहे.

अधिक माहिती करीत श्री रविंद सोरदे ( आरोग्य विस्तारअधिकारी
पंचायत समिती)8766585139 केशव गजभे (ग्रामसेवक, ग्रा. पं. मदनापूर) 9689248589,
श्रमाकांत गुरनुले(ग्रामसेवक ग्रा. पं. नवेगावपेठ 9075470838
यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन पंचायत समिती,चिमूर तथा म.रा.ग्रामसेवक युनियन शाखा-चिमूर (डि.एन.ई.-136) यांनी केले आहे.