इनोव्हा कार मध्ये सहा लाख रुपयाचा साठ किलो गांजा जप्त

23

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.10जुलै):- आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील 9वा मैल रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कार मध्ये साठ किलो गांजा मिळून आला जवळपास सहा लाख रुपयांचा गांजा सह सात लाख रुपये ची कार असा एकूण सुमारे 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस करीत आहेत याबाबत माहिती अशी की शुक्रवारी आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी दहावा मैल परिसरात गस्त घालत होते व 9 वा मैल जवळ पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार पार्किंग लाइट सुरू करून उभी होती.

पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांच्या गाडी जवळ जाऊन पाहिले गाडीमध्ये दोन गोण्यांमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू दिसली ही माहिती रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांना कळविण्यात आली त्यामुळे पोलिस घटनास्थळी दाखल झाले गाडीचा दरवाजा उघडताच दोन गोण्या मिळून आल्या व त्या गोण्या उघडले असता त्यात गांजा असल्याचे निष्पन्न झाले