नागरिकांनी कोरोना बाबतीत सतर्कता बाळगावी- व्ही आर मस्के

31

🔹पोईतांडा येथे 55 अँटीजन तर 30 आरटिपीसीर टेस्ट

✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख)

तलवाडा(दि.10जुलै):-कोविड-19 चा प्रादुर्भाव अजून कमी झालेला नाही,नागरिकांनी काळजी घेऊन वागावे व आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी असे मत तलवाडा ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी व्ही.आर.मस्के यांनी पोईतांडा याठिकाणी व्यक केले.गेवराई तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पोईतांडा या ठिकाणी कोविड चे 8 रुग्ण आढळून आल्याने परिसरात थोडे चिंतेचे वातावरण पसरले आहे,कोरोनाचा संसर्ग वाढत चाल ला असून त्या बाबत नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे,जे रुग्ण आढळून आले.

आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पण त्यांच्या नातेवाईक अथवा गावातील नागरिकांना याचा काही परिणाम झाला का यासाठी त्याची तपासणी करणे आवश्यक असल्याने त्या ठिकाणी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी तेथे जाऊन तपासणी केली,यामध्ये 55 अँटीजन तर 30 आरटिपीसीआर या तपासण्या कटण्यात आल्या.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.माने,आरोग्य सहायक धुरवडे आण्णा,ननवरे,ग्रामविकास अधिकारी मस्के यांच्या सह अशा वर्कर व कर्मचारी उपस्थित होते.