आ.महेश शिंदे यांच्या माध्यमांतून खटावमध्ये कोट्यवधींची विकासकामे मार्गी- महेश घाडगे

34

✒️प्रतिनिधी खटाव(नितीन राजे)

खटाव(दि.15जुलै):-निवडणुकीमध्ये जनतेला दिलेला शब्द खरा करत आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडत विजयी झालेले शिवसेनेचे लोकनियुक्त आ. महेश शिंदे यांच्या माध्यमातून खटाव मधील तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींची कामे मार्गी लागली असून, आज इंदिरानगर, शास्त्रीनगर, येथील काँक्रीट रोड चा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक खटाव ग्रामपंचायतीचे वार्ड क्रमांक चार चे सदस्य मा. महेश घाडगे यांनी ही माहिती दिली यावेळी संजय शिर्के, तानाजी घाडगे, अक्षय जाधव, नवनाथ घाडगे ,आदी मान्यवर उपस्थित होते.

राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या खटाव सारख्या गावांमध्ये सदैव विकासाच्या बाबतीत नेहमीच राजकारण करण्यात आले परंतु शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी अनेक कामे केली व नंतर जनतेत सांगितले ही सत्य परिस्थिती जनतेच्या लक्षात आली आहे. कोरोना सारख्या जागतिक महा मारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतः जनतेपर्यंत पोहोचणार आहे आमदार महेश शिंदे हे एकमेव व्यक्तिमत्व असून स्वखर्चातून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात चार कॉमेडी सेंटर उभारणारे महेश शिंदे जनतेसाठी दैवतच ठरत असल्याचेही यावेळी घाडगे यांनी सांगितले.