पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नाशिक निवासी उप जिल्हाधिकारी यांना भाववाढ कमी करण्यात यावी निवेदनद्वारे मागणी

26

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.20जुलै):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेबकटारे यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नाशिक निवासी उपजिल्हाधिकारी याना भाववाढीसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत महागाईमुळे सर्वसामान्य घटकांचे कंबरडेच मोडले असून गरीब घटक अत्यंत दयनीय अवस्थेत आपले जीवन जगत आहेत.

कोरोना महामारीच्या या भयंकर संकटामुळे तर अनेक लोकांचे रोजगार गेले असून छोट्या छोट्या व्यवसायिकांचे व्यवसाय बंद पडले ,समाजातील सर्वच घटक अत्यंत भयावह अशा स्थितीत आपले जीवन कंठीत आहे. केंद्र,शासनाने व राज्य शासनाने भाव वाढीवर त्वरित नियंत्रण न आणल्यास गरीब घटकांची परिस्थिती अधिकच दयनीय होण्याची भीती आहे.

निवेदनाचा विचार होऊन शासन स्तरावर भाववाढ कमी करण्याबाबत उचित कारवाई व्हावी याकरिता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आहे.
निवेदन सादर करतांना बिपीन कटारेयुवा नेतृत्व,बाळासाहेब साळवे शहराध्यक्ष ,जितू भाऊ बागुल युवा जिल्हाध्यक्ष ,मनोहर अण्णा दोंदे,धर्मराज पाईकराव(सातपूर शहर उपाध्यक्ष युवा आघाडी,शिवाजीराव गायकवाड,प्रशांत कटारे,राहुल भाई जाधव उपस्थित होते.