नगर परिषद अंबाजोगाई भ्रष्टाचाराची चौकशी करावी- वंचित बहुजन आघाडीचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

34

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई प्रतीनीधी)मो:-9763463407

अंबाजोगाई(दि.21जुलै):- उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. नगर परिषदेत झालेल्या विविध भ्रष्टाचाराची चौकशी व संबंधित जबाबदार प्रभारी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, कर्मचारी कंत्राटदार, कंपनी /एजन्सी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आपल्या निवेदनात केली. 

सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणारे अंबाजोगाई शहर आहे. परंतु मागील कांही महीन्यात कोरनामुळे हाजरो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे सबंध महाराष्ट्रात अंबाजोगाई शहराची वेगळीच ओळख झाली आहे. याला राजकीय नेते आणि सत्ताधारी हेच जबाबदार आहेत असे मत वंचितचे शहर प्रवक्ते गोविंद मस्के यांनी व्यक्त केले.
शौचालय घोटाळा चौकशी, स्वच्छता विभाग व पाणीपुरवठा गुत्तेदार देयक चौकशी, स्वच्छता विभागाच्या चुकीच्या बिलाच्या व धनादेश देण्यात आला.

याची चौकशी, संस्कृतीक सभागृहात खुर्ची खरेदी घोटाळा चौकशी,सदर बाजार शादीखान बोगस बांधकाम चौकशी, कोविड – 19 काळात साधन, सुविधा पुरविल्या म्हणून लाखोंची बिले मंजूर केल्याची चौकशी, नालेसफाई स्वच्छता चौकशी, दलित वस्ती सुधार निधी इतरञ वळविण्यात आला ची चौकशी, रमाई घरकुल योजनेची चौकशी, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश कांबळे, ता. अध्यक्ष संजय तेलंग, प्रवक्ते गोविंद मस्के, देविदास बचूटे, सुशांत धावरे, दहीवडे जयपाल, सुभाष शिंदे, भिमराव, धीरे, रमेश शिंदे, परमेश्वर जोगदंड, स्वप्नील सरवदे, महादेव व्हावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.