साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार मिळाला पाहिजे – नगराध्यक्ष कासम भाई गवळी

29

✒️मनोज नगरनाईक(खामगाव प्रतिनिधी)

मेहकर(दि.21जुलै):-लोकशाहीर ,साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे असे प्रतिपादन नगराध्यक्ष कासम भाई गवळी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले यावेळेस पुढे आपले विचार व्यक्त करताना कासम भाई म्हणाले की,अण्णाभाऊ साठे यांनी केवळ दीड दिवस शाळा शिकली .तरीही पण त्यांनी अनेक साहित्य लिहीले त्यांनी लिहिलेली फकिरा ही कादंबरी फार प्रसिद्ध झाली.

म्हणून त्यांना साहित्य सम्राट असे म्हणतात. छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथे 30/08/1988 ला श्री मुकुलजी वासनिक साहेब हे अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांच्या शुभ हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. असेही प्रतिपादन त्यांनी केले. अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कासम भाई गवळी होते.

तर प्रमुख उपस्थिती म्हणुन माजी नगर सेवक सुरेश मानवतकर,नगर सेवक पंकज हजारी, ललित इन्नानी , निलेश मानवतकर, संजय ढाकरके, निलेश सोमण, अलीयार खान, माजी नगरसेवक गजानन जावळे,हबीब बागवान, ॲड. किशोर धोंडगे, गजेंद्र माने, जयदीप देशमुख, ॲड.गजानन लांडगे, विजू म्हस्के , विकास पवार,शेरु कुरेशी,समाधान साठे(लहुशक्ती प्रदेशअध्यक्ष) हे होते.या प्रसंगी पंकज हजारी यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाले पाहिजे अशी मागणी केली.

त्याच प्रमाणे गजेंद्र माने,सुरेश मानवतकर,समाधान साठे, ॲड.गजानन लांडगे यांनीही आपले विचार मांडले.यावेळेस या कार्यक्रमाला हुसेन गवळी,महेबुब गवळी, चांद भुरीवाले, राजू भवानी वाले, शामा भवानी वाले, इमाम, परसूवाले, प्रदीप अंभोरे, तानाजी मानवतकर, सुधीर तौर, दिलीप मानवतकर, राहुल सुरेश मानवतकर,रवि इंगळे,मुकेश रनखांब, अविनाश रनखांब, अनिल मानवतकर, दिनेश डोंगरे, रोहित बाजड,गणेश खरात, अनंत मानवतकर, आशिष मानवतकर, महेश तौर,सौरभ खिल्लारे,रोहित मानवतकर, गणेश सपकाळ यांचीही उपस्थिति होती. शेवटी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे संचालन गजेंद्र माने सर यांनी केले.