जि.प.सदस्या श्रीम.वर्षाताई माळी यांच्या स्थानिक निधीतून बर्डे वस्ती शाळेला शाळा खोली बांधकाम मंजूर

22

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि 22जुलै):-जि.प.प्रा.शा.बर्डे वस्ती कारखेल खु.ता.आष्टी,जि.बीड येथे सन २००१ पासून वस्तीशाळा होती.ही शाळा सन २००९ ला शासन निर्णयानुसार बंद करण्यात आली होती.तेथील शिक्षक सुदर्शन घुले यांच्या सततच्या प्रयत्नाने या शाळेचे सन २०१३ मध्ये जि.प.प्राथमिक शाळेत रुपांतर झाले.एक शिक्षकी शाळा दोन शिक्षकी झाली.वस्तीशाळेवर पूर्वीपासून सुदर्शन घुले हे काम करत असल्यामुळे तेथेच त्यांची नेमणूक करण्यात आली.शाळेला इमारत नसल्याने ही शाळा सध्याही पत्र्याच्या शेडमध्ये,गोठ्यात तर कधी सभागृहात भरत असल्याने ही बाब दौलावडगांव गटाचे जिल्हा परिषद सदस्य पती सुरेशराव माळी यांच्यापर्यंत पोहोचली.

माजी सरपंच सचिन घुले व लक्ष्मण (पप्पू) घुले यांनी हे त्यांना दोन वर्षापूर्वी शाळेवर घेऊन आले व त्यांनी शाळेची अडचण त्यांच्या लक्षात आणून दिली.

लगेच त्यांनी त्यावेळी शब्द दिला की,मी कोणत्याही परिस्थितीत शाळेला खोली देईल.अखेर शेवटी त्यांनी दिलेला शब्द पाळला व खोली बांधकाम दिले.तिचे उद्घाटन जि.प.सदस्य सुरेशराव माळी,कारखेल खु.चे सरपंच रघुशेठ घुले,देऊळगाव घाट चे सरपंच रामकिसन ठोंबरे मा.सरपंच सचिन घुले,लक्ष्मण पाटील घुले,मा.उपसरपंच आजिनाथ बर्डे,लक्ष्मण (पप्पू) घुले,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय वनवे,आजिनाथ घुले,गोविंद घुले,मच्छिंद्र बर्डे,नवनाथ पाटील घुले,देविदास घुले,अनिरूद्ध गव्हाणे,गहिनीनाथ घुले,सोन्याबापू घुले,शा.व्य.समिती अध्यक्ष केशव बर्डे,बाबासाहेब गव्हाणे,कैलास घुले,लक्ष्मण बर्डे,जालिंदर घुले,गोविंद बर्डे,आसाराम घुले,तुळशीराम बर्डे,संपत बर्डे,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक बापू फसले,कोहोक सर,राजेंद्र शेकडे,विठोबा मुळे आदींच्या उपस्थितीत कोरोना चे नियम पाळून उद्घाटन समारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब शिरसाठ यांनी केले तर शाळेला खोली दिल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्या श्रीम.वर्षाताई सुरेशराव माळी यांचे आभार बाळासाहेब शिरसाठ,सुदर्शन घुले व बर्डे वस्ती आणि कारखेल खु. येथील विद्यार्थी व पालक यांनी विशेष आभार मानले.