गंगाखेडात बसस्थानकाच्या जीर्ण इमारतीत थांबण्यापासून प्रवाशांना रोखा

28

🔸सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांची मागणी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.22जुलै):-मोडकळीस आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीत प्रवाशांना थांबण्यापासून रोखत संभाव्य अपघात टाळण्याची मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक ,परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी आगार प्रमुखकाकडे मंगळवारी केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की गंगाखेड एसटी आगाराची जुनी इमारत आहे. अनुभवी कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार याचे बांधकाम 1978 काळात करण्यात आले आहे .या इमारतीचे दोन वर्षांपूर्वी फॉर्च्युनर एडिट करण्यात आले असून या ऑडिटमध्ये ही इमारत पाडून टाकावी किंवा वापरण्यास योग्य नसल्याचे अहवाल आला असतानाही एसटी महामंडळाकडून या इमारतीचा वापर सुरूच आहे.

मागील दोन वर्षापासून अनेक वेळा या इमारतीच्या छतास तडे जाऊन बरेचसे प्रवासी जखमी झाले आहेत. मागील आठ दिवसापासून परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसाने ही इमारत गळत असून केव्हाही ही इमारत पडून प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी या इमारतीत येणाऱ्या प्रवाशांना इमारतीत थांबण्यापासून रोखत त्या प्रवाशांचे संभाव्य अपघात टाळावे अशी मागणी करण्यात आली आहे. दुर्देवाने प्रवाशांची जीवित हानी झाल्यास आगार प्रमुख म्हणून आपणास जबाबदार धरण्यात येईल अशी मागणीही करण्यात आली.

आगारप्रमुख रामेश्वर हाडबे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात आली. त्या ठिकाणाहून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधत हकीगत सांगण्यात आली. आगामी आठ दिवसात या इमारतीत थांबणे पासून प्रवाशांना न रोखल्यास आम्ही स्वतःहून जाहीरपणे या इमारतीत प्रवाशांनी थांबू नये असे आव्हान करू असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर ,शेषराव आव्हाड अनिल बोबडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.