झाडीबोली साहित्य मंडळाचे वार्षिक साहित्य तथा कलावंत पुरस्काराचे वितरण

52

🔸मारोती आरेवार, देविदास शेंडे , डाॕ.लेनगुरे सन्मानित

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.23जुलै):-झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने यावर्षीपासून साहित्य आणि कलावंत पुरस्कार सुरू केलेले आहे. गेल्या सत्रात जिल्ह्यास्तरीय प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहास , झाडीबोली साहित्य लेखनास आणि लोककलेची दीर्घ सेवा करणाऱ्या कलावंतास देण्याचे निश्चित केल्यानंतर प्रवेशिका बोलावण्यात आल्या होत्या . आलेल्या प्रवेशिकेतून निवड समितीने दुधरामजी समर्थ स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कारासाठी मारोती आरेवार यांच्या आभाळाखालच्या मातीतून या काव्यसंग्रहाची निवड केली.

तर दिवं. तुळसाबाई किसनराव दशमुखे स्मृती ज्येष्ठ लोककलावंत पुरस्कारासाठी गुरनोलीच्या देविदास शेंडे यांची निवड करण्यात आली.सौ.हिमालया संजीव बोरकर पुरस्कृत झाडीबोली साहित्यलेखन पुरस्कारासाठी डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांच्या झाडीचा गोंदा या झाडीकाव्यसंग्रहाची निवड करण्यात आली होते.

निवड झालेल्यांना पुरस्कारादाखल रोख रक्कम , शाल आणि स्मृतीचिन्ह मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे वितरण परिश्रम भवनात गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डाॕ. अनिल चिताडे , ज्येष्ठ साहित्यिक ॲड. लखनसिंह कटरे , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , गझलकार मिलिंद उमरे , मनिष समर्थ ,कवी अरूण झगडकर या मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले. प्रास्तविक सचिव कमलेश झाडे यांनी केले तर विजेत्यांची घोषणा संजिव बोरकर यांनी केली. निवड झालेल्या विजेत्यांचे झाडीबोली साहित्य मंडळाचे संस्थापक डाॕ. हरिश्चंद्र बोरकर , केशवराव दशमुखे गुरूजी, पं.स.उप सभापती विलासराव दशमुखे , कवी संजिव बोरकर तसेच सर्व कार्यकारी सदस्यगणांनी अभिनंदन केलेले आहे.