पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी गांधीगिरी आदोंलन

32

🔸राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ संस्थापक अध्यक्ष – संतोष निकम यांचा इशारा

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.23जुलै):- पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याऐवजी अनेक वेळा पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघ हे कदापी खपवून घेणार नाही. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांच्या विविध मागण्या संदर्भात राज्य शासनाकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे पत्रकारांच्या या मागण्या पूर्ण न झाल्यास स्वातंत्र्यदिना पासून राज्यव्यापी गांधीगिरी आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी दिला आहे.

संतोष निकम हे राज्यातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य दौऱ्या प्रसंगी पुणे येथे राष्ट्रीय विश्‍वगामी ह्यूमन राइट्स संघाच्या वतीने आयोजित पदग्रहण समारंभात बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते महेश पुंड, राष्ट्रीय विश्‍वगामी ह्यूमन राइट्स संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा प्रज्ञा कांबळे, प्रदेशाध्यक्ष संतोष जाधव, पत्रकार संघ प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील, प्रदेश सचिव रमेश देसाई, शिक्षक संघ प्रदेशाध्यक्ष प्रा. भागवत महाले, महिला संघ प्रदेश उपाध्यक्ष मिरा गोसावी, मंगल निकम, प्रदेश उपसचिव वैशाली बनसोडे, उषा अहिरे, तानाजी निकम, प्रकाश गोसावी, डॉ प्रशांत पिंगळ, तानाजी निकम, कलावंत संघ अध्यक्ष दिलीप गांगोडे ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर शिरसागर, कार्याध्यक्ष गिरीश घोरपडे, पश्‍चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख वसंत कांबळे, कोकण विभाग प्रमुख सुरेश सपकाळे, पुणे जिल्हा अध्यक्षा उज्ज्वला गौड, अरुण शेंडकर शहर अध्यक्ष मनीष घुले पाटील आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय विश्‍वगामी ह्यूमन राइट्स संघाच्या वतीने संवाद कट्टा कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून लाभलेल्या मान्यवरांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोरोना योध्दा सन्मानपत्र,नियुक्तीपत्र ओळखपत्र वाटप करण्यात आले. यावेळी हयूमन राईट्स संघ प्रदेश सचिव माधुरी कुलकर्णी, श्रीकांत मोरे, वैशाली कुलकर्णी, निकिता पाठक, कल्पना सोनार, पृथ्वीराज सावंत, महेश कुलकर्णी, जयंत भोसले, अँड विरेंद्र ठाकूर, नंदकुमार बोळे, रोहित घोरपडे, आशा बागडे, प्रदीप देवकुळे, अमित रावल, लक्ष्मी शेट्टी, विद्या ठिपसे, महेश कळसकर, विलास धुमाळ, हेमंत नवसारे, प्रमोद रणदिवे, हरीहर कुलकर्णी, अंकुश शेंडकर, धनंजय धारक, प्रमोद मोरे, दादा पवार, सुशांत भोसले, शशिकांत कवडे, संभाजी घुले, अरविंद जाधव, अर्जुन काळभोर, बाळासाहेब सणस, शंकर भालेराव, जतीन दुगड, तुळजाराम भास्कर, दत्ता जाधव संजीव नाईक, बालाजी माने, प्राजक्ता कांबळे, राजन देवधर, जितेंद्र गौंड स्वातिक चौधरी अजिनाथ बंडगर, आश्रम बंडगर, अंकुश बंडगर, उमेश दाखटकर, भरत आडकर, सागर भोसले संजीव नाईक, दत्ता जाधव, मनीषा नाईक, ज्योती चव्हाण, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष जाधव, सूत्रसंचालन उज्ज्वला गौड, आभार प्रदर्शन अरुण शेंडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय विश्‍वगामी ह्यूमन राइट्स संघाचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.