उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आष्टीला उपजिल्हा रुग्णालय आणणार – आ.बाळासाहेब आजबे

28

🔸आष्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध आरोग्य शिबिराने साजरा

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.23जुलै):-सध्याचा काळ हा कोरोनाने भंयकर झाला असून,सर्वसामान्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात भरपूर पैसे मोजावे लागत आहेत.परंतु आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात आता जवळपास सर्वच सुविधा देण्याचा आपण प्रयत्न केला आहे आणि अजूनहीअद्यावत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय येथे सर्वसामान्यांसाठी संकल्प निरोगी बीड अभियानाअंतर्गत विविध आरोग्य शिबिराचे उद्घाटन करून ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात गरोदर मातांचे सोनोग्राफी सेंटर सुरू केल्याने तालुक्यातील लाभार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे अहवान आ.बाळासाहेब आजबे यांनी केले.

        राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आनावश्यक खर्च टाळत फक्त समाजउपयोगी कार्य करत हा वाढदिवस आष्टी येथे साजरा करण्यात आला.गुरूवार दि.२२ रोजी सकाळी ११ वा.आ.बाळासाहेब आजबे यांच्याहस्ते आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.गरोदर मातांचे सोनोग्राफी सेंटरचे उद्घाटन व ब्लड स्टोरेज मशीनचे लोकार्पण आ.आजबेंच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी या कार्यक्रमास ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.राहूल टेकाडे,वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी गुट्टे,डाॅ.किशोर भोसले,रोहोयो समितीचे तालुकाध्यक्ष जगनाथ ढोबळे,संजय गांधी निराधार समितीचेअध्यक्ष अजिनाथ गळगटे,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस राम खाडे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.आजबे म्हणाले,आष्टी हा सर्वात मोठा क्षेत्र असलेला तालुका असून,या ग्रामीण रूग्णालयाचे लवकरच उपजिल्हा रूग्णालय करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत.

तसा प्रस्तावही आपण वरिष्ठाकडे पाठवला असून पाठपुरवठा सुरू आहे.लवकरच हे उपजिल्हा रूग्णालय होणार आहे.आत्ताच आपण हे रूग्णालय जवळपास १५० आँक्सीजन बेडने तयार केले आहेत.सध्या कोरोनाची भयान परिस्थिती निर्माण झाली असून,दिवसेदिवस आष्टी तालुक्याची कोरोनाची रूग्ण संख्या वाढतच आहे.यासाठी नागरीकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशाने आम्ही कसलीही बॅनरबाजी न करता समाजहिताचे काम करत हा वाढदिवस साजरा केला आहे.

या कार्यक्रमासाठी रोहयो समिती चे अध्यक्ष जगन्नाथ ढोबळे संजय गांधी समितीचे अध्यक्ष आजिनाथ गळगटे जिल्हा सरचिटणीस रामभाऊ खाडे सुभाष वाळके शिक्षक नेते बाळासाहेब महाडिक सरपंच अशोक पोकळे,अर्जुन काकडे, राजू जरांगे,भाऊ घुले ,नाजीम शेख,शिरीष थोरवे,समीर जाठवत, सरपंच राहुल जगताप, नासीर पठाण फिरोज पठाण,दादा बंन,शिवाजी चव्हाण,योगेश भगत,बबलू भवर,विजू मुटकुळे,महेश सोले,ज्ञानदेव कोंडे,बाळू पोकळे,भाऊसाहेब पवार,सतीश सोले,सरपंच रामदास उदमले,राहुल जेवे,रामहारी ठोंबरे,बलभीम काळोखे,बाबा वाघुले,अर्जुन काकडे,राम गोंदकर,दिलीप चव्हाण,अण्णासाहेब साबळे,संतोष कदम,बबन काळे,अनिल काळे,परमेश्वर पवार यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
————
विविध उपक्रमांनी केला वाढदिवस साजरा
आष्टी तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचा-यांची आज मोफत बी.पी.,शुगरची तपासणी करत ग्रामीण रूग्णालयात स्रीरोग,ह्रदयरोग व बालरोग,तपासणी व या विषयावर मार्गदर्शन विविध तज्ञांनी केले.तसेच ग्रामीण रूग्णालय परिसरात वृक्षारोपणही करून,तालुक्यातील ३२ दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटपही आ.आजबेंच्या हस्ते करत समाजउपयोगी उपक्रमाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा केला.