जपानचे सामर्थ्यांच प्रतिक

28

वरील छायाचित्र द्वितीय महायुद्धातलं आहे.

अमेरिकन फोटोग्राफर जो ओडोनेलने १९४५ साली जपानमधील नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला झाल्यानंतर हे छायाचित्र टिपलं होतं.जवळपास ८-९ वर्षांचा एक जपानी मुलगा आपल्या वर्षभराच्या लहान भावाचा मृतदेह पाठीवर बांधून त्याच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानात रांगेत उभा होता. फोटोग्राफर जो ओडोनेलने अशी माहिती दिली की, त्या उभ्या असलेल्या मुलाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता आणि रडणं टाळण्यासाठी तो आपले ओठ दातांनी जोरजोरात चावत होता. इतक्या जोरात की त्याचे ओठ फाटून त्यातून रक्त यायला लागलं होतं.

जेव्हा तिथे उभ्या असलेल्या एका स्मशानातल्या रक्षकाने त्याला विचारलं.. “ते तुझ्या पाठीवर असलेलं ओझं मी घेतो.”यावर त्याने उत्तर दिलं. “हे कुठलंही सामान किंवा ओझं नाही… हा माझा भाऊ आहे !”आजही जपानमध्ये हे छायाचित्र सामर्थ्याचं प्रतीक म्हणून वापरतात.आणि आपल्या देशात भाऊ-बहिणी जमिनीच्या तुकड्यांसाठी भांडत आहेत आणि मरत आहेत.तीस टक्के भाऊ तर हे एकमेकांना कोर्टाच्या दाराजवळच भेटतात.

✒️संकलन: सागर रामभाऊ तायडे