नियम न पाळणा-यांवर वेळप्रसंगी गुन्हे दाखल करणार – तहसिलदार श्रीम.शारदा दळवी

30

🔸तहसिलदार,गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षक रस्त्यावर

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.24जुलै):-गेल्या महिनाभरापासून आष्टी तालुक्याची कोरोना बाधीतांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याने तालुक्यातील आज विकेंडे दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवारी तरी काम नसेल तर घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे,जर नागरीक,व्यापारी नियम पाळत नसतील तर प्रशासन कठोर कारवाई करून,नियम न पाळणा-यांवर वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्याचा इशारा तहसिलदार श्रीमती शारदा दळवी यांनी दिला आहे.

             बीड जिल्हाधिकारी यांनी आष्टी,पाटोदा आणि गेवराई ह्या तीन तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने कडम नियामली बनवली आहे.तर आज शनिवार दि.२४ रोजी सकाळी ११ वा.वीकेंडे दिवशी शहरातील सर्व दुकाने बंद आहेत का?नागरीक व्यापारी नियम पाळतात का? याची खातरजमा करण्यासाठी आष्टी तहसिलदार श्रीमती शारदा दळवी,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी आष्टी,कडा,धामणगांव परिसरात स्वतः रस्त्यावर उतरून नागरिक व्यापा-यांना सुचना दिल्या.यावेळी तहसिलदार दळवी पत्रकारांना बोलत होत्या.पुढे बोलतांना त्या म्हणाल्या,कोरोना अजूनही संपलेला नाही.नागरीकांनी गाफील न राहता नियमांचे पालन करावे,तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

जर आपण नियम पाळले नाहीत तर परिस्थिती आणखी वेगळी दिसू शकते.आज आम्ही ज्यावेळी व्यापारपेठेत फिरलोत तेव्हा बरेच व्यापारीच नियम पाळत नसल्याचे दिसून आले.परंतु यापुढे जर व्यापारी तसेच नागरीकांनी प्रशासानाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले नाहीत तर वेळप्रसंगी आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.