उमरखेड यथे कारगिल विजय दिवस साजरा

48

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.27जुलै):-भारताच्या शोर्याच प्रतीक म्हणून कारगिल विजय दिवस प्रत्येक वर्षी २६जुलै ला साजरा केला जातो. या दिवशी १९९९ रोजी कारगिल युद्धात पाकिस्तानला हारवुन भारताने विजय मिळवला होता. आपल्या प्राणाची आहुती देणार्या भारतीय सैनिकाच्या बलिदानाच स्मरण केले जाते. हे युद्ध ३ मै १९९९ ला सुरु झाले होते आणि २६ जुलै १९९९ भारताने पाकिस्तानला हारवुन विजय मिळवला होता. या युद्धात भारताच्या दोन लाख सैनिकांनी भाग घेतला होता, तर पाचशे सताविश जवान शहीद झाले होते.

सैनिकांच्या आढवणीत प्रत्येक वर्षी भारतात शहिदांना नमन करण्यात येत. दिनांक २६जुलै रोजी उमरखेड यथे माजी सैनिक संघटना उमरखेड व वृक्ष संवर्धनसमिती उमरखेड यांनी कारगिल विजय दिवस बर्ड गार्डन यथे साजरा करण्यात आला. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी कारगिल युद्धात सहभागी असलेले मेजर आणि सध्या तलाठी पदावर धनज यथे कार्यरत असलेलले जि.एस.मोळके साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला.यावेळी माजी सैनिक संघटना उमरखेड चे अध्यक्ष विवेक मुडे,विणकरे सर,हुंबे सर ,बर्ड गार्डन वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष दिलिप भंडारे, दिपक ठाकरे विरेंद्र खंदारे व माजी सैनिक उपस्थित होते.

सर्व प्रथम कारगिल युध्दात शहिद झालेल्या जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले.