मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्य शहर शिवसेने तर्फे नेत्र तपासणी शिबीर व वृक्षारोपण संपन्न

85

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.29जुलै):-शिवसेना जिल्ह्या प्रमुख मा.श्री नितीनभाऊ मत्ते, विधानसभा संपर्क प्रमुख मा संजयजी काळे साहेब यांच्या सूचनेनुसार शिवसेना शहर प्रमुख नरूभाऊ नरड यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी तालुका व शहर शिवसेना युवासेनेच्या वतीने तालुक्यात हलदा व किन्ही या गावात मोफत नेत्र तपासणी शिबीरचे आयोजन 23 जुलै ला करण्यात आले होते.त्याचप्रमाणे ब्रम्हपुरी शहरात 27 जुलैला विद्यानगर परिसरात व ब्रम्हपुरी-वडसा या महामार्गावर वृक्षारोपण करून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस शिवसैनिकांनी साजरा केला.

यावेळी श्री नरूभाऊ नरड(शिवसेना शहर प्रमुख),माजी तालुका प्रमुख नरेंद्र गाडगीलवार,किशोरभाऊ चौधरी,पराग माटे(उप तालुका प्रमुख) खुर्शीद शेख,वीणाताई गोडपागे(उपजिल्हा संघटिका),जयाताई कंनाके(तालुका संघटिका),निर्मलताई राऊत,सुरेखाताई पारधी,आकाश शेंद्रे(युवा सेना ता प्रमुख),अमोल माकोडे(युवा सेना शहर प्रमुख),आशिष गाडलेवार(उपशहर प्रमुख युवा सेना),प्रशांत साहरे(उप ता युवा सेना),अमोल ठिकरे,रेशीम बनपूरकर,अतुल निबाडकर,आकाश रुशिया आधी शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक युवासैनीक उपस्थित होते.