रमाई आवास योजनेसाठी ‘प्रपत्र- ड’ ची जाचक अट रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा वंचित चा इशारा.

30

✒️संजय कांबळे(अहमदपूर प्रतिनिधी)

अहमदपूर(दि.29जुलै):-लातूर जिल्हा परिषद अंतर्गत अहमदपूर तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेत ड पत्रकाची जाचक अट रद्द करावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये अहमदपूर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात नव्हे तर लातूर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात रमाई आवास योजनेसाठी ड पत्रकाची अट नसताना अहमदपूर पंचायत समितीचा मात्र तुघलकी कारभार सुरू आहे.

अहमदपूर पंचायत समितीने रमाई आवास योजनेच्या लाभासाठी ड पत्रकामध्ये नाव असण्याची अट घातली असल्यामुळे गरीब, शोषित, पीडित, गरजू हे या योजनेपासून वंचित राहत आहेत, त्यामुळे ही अट तात्काळ रद्द करावी अन्यथा नऊ ऑगस्ट म्हणजेच क्रांतिदिनी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अहमदपूर पंचायत समितीच्या समोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.दिलेल्या मुदतीत जर ही अट रद्द नाही झाल्यास स्वातंत्र्यदिनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सहदेव जी होनाळे व महासचिव सारीपुत्र ढवळे यांनी दिला आहे.

सदरील मागण्यांचे निवेदन लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुलजी केंद्रे,यांची वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन दिले या निवेदनाच्या प्रति अहमदपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मार्फत प्रकल्प संचालक,जि. प लातूर, तहसीलदार अहमदपूर यांना योग्य त्या कार्यवाहीसाठी देण्यात आले असून या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी चे नेते तथा पदाधिकारी विनयकुमार ढवळे, ता.उपाध्यक्ष-उत्तम गोरे, माधव मुरकुटे, ता.सचिव- मंगेश स्वामी, राम कांबळे, मच्छिंद्र चौथरे, धर्मपाल कांबळे,आमरदिप कांबळे, अनिल कदम, श्याम कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकार्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.