उमेद फाऊंडेशनचे काम कौतुकास्पद

24

✒️संदीप मिठारी(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.29जुलै):-शाहूवाडी मधील सावर्डे येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या कुटुंबाच्या घरांची पडझड झालेली आहे अशा शाहूवाडी येथील कुटुंबीयांना सामाजिक संस्था उमेद फौंडेशन स्वयंसेवक संघ यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले या किटमध्ये पाच किलो आटा, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो मुगडाळ,अर्धा किलो तूरडाळ, अर्धा किलो मीठ, अर्धा किलो कांदा लसूण चटणी ,चहापूड , बटाटा एक किलो, अख्खा मसूर अर्धा किलो, साखर एक किलो, मोठी मेणबत्ती २ नग, काडीपेटी बॉक्स,गोदरेज साबण २ नग, कपड्याचा साबण २ नग, निरमा पावडर अर्धा किलो या वस्तूंचा समावेश आहे.

सावर्डी येथे 6 ते 7 ठिकाणी भूस्खलन होऊन रस्ता बंद असल्याने उमेद फौंडेशनच्या पूर्ण टीमने 6 km पायीं चालत जाऊन नुकसान ची पाहणी करून मदत पोहोच केली. मदत पोहोच करण्यासाठी उमेदीयन अभय पाटील , विक्रम म्हाळुंगेकर , दशरथ आयरे सर , प्रकाश गाताडे,विघ्नेश पाटील ,सिद्धेश पाटील ,आकाश डबीरे , यांनी मदत केली. उमेद फौंडेशन यांच्याकडून शाहूवाडीतील सावर्डे येथे अनेकांच्या घरी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी पूरग्रस्त लाभार्थी व गावकरी उपस्थित होते. गावकऱ्यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकयांनी उमेद फौंडेशन संघाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. याच बरोबर उमेद फाउंडेशन कडून, प्रत्येक आपत्तीच्या वेळी मदतीसाठी आम्ही तत्पर राहू असे आश्वासन देण्यात आले.