ओतप्रोत देशभक्ती कथा : इंग्रज सरकारला व्यथा

28

[मुन्शी प्रेमचंद जयंती विशेष]

मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे दि.३१ जुलै १८८०रोजी झाला. ते हिंदी व उर्दू साहित्यातील नावाजलेले लेखक होते. त्यांना उपन्यास सम्राट म्हणून गौरविले जाते. त्यांनी एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी ‘असरारे महाबिद’ उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक ‘आवाज-ए-ख़ल्क’मध्ये दि.८ ऑक्टोबर १९०३पासून क्रमशः प्रसिद्ध झाली. तर त्यांची शेवटची कादंबरी ‘मंगलसूत्र’ अपूर्ण राहिली.प्रेमचंद यांनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली सरकारी नोकरी सोडली. पहिली कादंबरी हिंदुस्थानवरील ब्रिटिश सत्तेच्या जुलूम व भारतीयांच्या गुलामगिरीवर लिहिली. ती जेव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली तेव्हा ती जप्त झाली. मात्र देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होण्यापासून ते वाचले. त्यानंतर त्यांनी आपले नबाब धनपतराय हे नाव बदलून प्रेमचंद धारण केले. इ.स.१९२१पर्यंत प्रेमचंद शिक्षण खात्यात डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी करीत होते. मात्र त्यानंतर ते बनारसला परतले आणि त्यांनी फक्त देशमुक्तीच्या संघर्षाकरिता आपली लेखणी चालवण्याचे ठरविले.

इ.स.१९२३मध्ये त्यांनी सरस्वती प्रेसची स्थापना केली. प्रेसच्या खर्चासाठी कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने प्रेमचंद मुंबईला आले व त्यांनी एक चित्रपटकथा लिहून दिली. चित्रपटात त्यांनी मजुराच्या बापाची भूमिकाही केली. मात्र वर्षभरातच ते परत गेले. ते लेखणीचा शिपाई तथा आधुनिक हिंदी साहित्याचे पितामह म्हणून ओळखले जातात. सन १९०१पासून त्यांच्या साहित्यिक जीवनाचा आरंभ झाला. पण त्यांची पहिली हिंदी कथा सरस्वती पत्रिकेत सन १९१५मध्ये ‘सौत’ या नावाने प्रकाशित झाली. त्यांचा पहिला कथासंग्रह ‘सोजे वतन’ देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत असल्याने त्यांवर इंग्रज सरकारने बंदी घातली. अशा प्रकारचे लेखन करू नये, म्हणून बजावण्यात आले.
मरणोपरान्त त्यांची कथा मानसरोवर नावाने ८ खंडांमध्ये प्रकाशित झाली. त्यांची शेवटची कथा ‘कफन’ सन १९३६मध्ये प्रकाशित झाली. याच्या आधी हिंदीमध्ये काल्पनिक, अय्यारी आणि पौराणिक धार्मिक रचनाच प्रकाशित केली जात होती. त्यांनी हिंदीमध्ये यथार्थवादाची सुरुवात केली. भारतीय साहित्याचा बराचसा विमर्श नंतर समोर आला. दलित साहित्य आणि नारी साहित्याची खोलवर मुळे प्रेमचंदांच्या साहित्यात दिसली. त्यांचा ‘पहली रचना’ हा आपल्या मामांवर लिहिलेला व्‍यंगलेख होता. त्यांचा पहिला उर्दू उपन्यास ‘असरारे हमसवाब’ होय. याचे हिंदीत रूपांतर प्रेमा नावाने प्रकाशित झाले.

त्यांची दुसरी कादंबरी ‘हमखुर्मा व हमसवाब’ पण प्रकाशित झाली. त्यांची पहिली कथा ‘बड़े घर की बेटी’ ज़माना पत्रिकेमध्ये डिसेंबर १९१०च्या अंकात प्रकाशित झाली. कथा सम्राट प्रेमचंदांचे म्हणणे होते की साहित्यकार देशभक्ति आणि राजनीतीच्या मागे जाणारी सच्चाई नाही तर त्याच्या पुढे मशाल दाखवत चालणारी सच्चाई आहे. हे सत्य त्यांच्या साहित्यातून दिसून येते. काही महिने मर्यादा पत्रिकाचा संपादनभार सांभाळला. सहा वर्षापर्यंत माधुरी पत्रिकेचे संपादन केले. सन १९३०मध्ये बनारस येथून आपले मासिक पत्र ‘हंस’ सुरू केले आणि जागरण नावाने एक साप्ताहिक काढले. लखनौमध्ये सन १९३६ साली झालेल्या अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मोहन दयाराम भवनानींच्या अजंता सिनेटोन कंपनीमध्ये कथालेखक म्हणून नोकरीपण केली. सन १९३४मध्ये प्रदर्शित मजदूर या फिल्मची कथा लिहिली व कॉन्ट्रॅक्ट केलेल्या वर्षभराचा कालावधी पूर्ण करण्याआधीच दोन महिन्‍याचा पगार सोडून ते बनारस येथे पळून गेले. त्यांनी मूळरूपाने हिंदीमध्ये सन १९१५पासून कथा व कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली.

प्रेमचंदांना ‘मुन्शी प्रेमचंद’ या नावाने ओळखले जाते. प्रेमचंदांच्या नावाला ‘मुंन्शी’ कधी आणि केव्हा चिकटले? या विषयावर बहुतेक लोक हेच मानतीत की सुरुवातीला प्रेमचंद अध्यापक होते अध्यापकांना त्या वेळी मुन्शी म्हटले जाई. शिवाय कायस्थांच्या नावापुढे सन्मानस्वरूपी ‘मुन्शी’ शब्द लावण्याची परंपरा होती म्हणून प्रेमचंदांच्या नावाआधी मुन्शी शब्द रूढ झाला. प्रोफेसर शुकदेवसिंहांच्या मते प्रेमचंदांनी आपल्या नावाआधी ‘मुन्शी’ शब्दाचा प्रयोग स्वतः कधी केला नाही. प्रेमचंदांच्या प्रशंसकांनी ‘मुन्शी’ कधी लावले? हे केवळ तर्काने जाणून घेता येते. हे विशेषण जोडण्याचे प्रामाणिक कारण की ‘हंस’ नामक पत्रिका प्रेमचंद आणि ‘कन्हैयालाल मुन्शी’ यांच्या सहसंपादनामध्ये निघत असे. त्याच्या काही प्रतींवर कन्हैयालाल मुन्शींचे पूर्ण नाव न छापता फक्त ‘मुन्शी’ छापलेले असायचे. त्यामुळे प्रेमचंदांच्या नावालाही मुन्शी चिकटले. जर मुन्शी प्रेमचंद असे म्हटले नाही तर ते नाव अपूर्ण वाटते. त्यांचा मृत्यू दि.८ ऑक्टोबर १९३६ रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला. गोरखपुरच्या ज्या शाळेत ते शिक्षक होते, तेथे प्रेमचंद साहित्य संस्थेची स्थापना केली आहे.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जयंती निमित्त त्यांना व त्यांच्या अष्टपैलू लेखणीला विनम्र अभिवादन !!

✒️ संकलन -श्री निकोडे कृष्णकुमार गुरुजी(मराठी व हिंदी सारस्वत विदर्भ प्रदेश.)मु. पो. ता. जि. गडचिरोली.फक्त व्हॉ. नं. ७४१४९८३३३९.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com