प्रहार संघटनेच्या जातेगाव सर्कल प्रमुख पदी शरद चांभारे यांची निवड

22

✒️गेवराई प्रतिनिधी(देवराज कोळे)

गेवराई(दि.30जुलै):-तालुक्यातील प्रहार संघटनेची
कार्यकारिणी जाहीर झाली आहे त्याअनुषंगाने यमादेवि मंदीर जातेगाव या ठिकाणी प्रहार संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जातेगांव सर्कल प्रमुख प्रहार संघटनेच्या पदी शरद चांभारे नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली तसेच गेवराई तालुका संपर्क प्रमुख पदी शेख इब्राहिम व यांची निवड करण्यात आली.

या वेळी यावेळी ओबीसी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष निजाम भाई पठाण,प्रहार ता.अध्यक्ष अर्जुनजी सुतार,ओ.अल्पसंख्याक ता.अध्यक्ष जनार्धन काका पवार,युवक ता.अध्यक्ष अजय डोंगरे युवानेते अमरसिंह चांदर,अभय महाराज,रोहिदास मस्के,माऊली पवार यासह युवक व प्रहार सेवक उपस्थित होते.व या निवड झाल्याबद्दल पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष देवराज कोळे, भाजपा नेते गोपाल चव्हाण शिवसेना नेते अशोक तौर राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे कोषाध्यक्ष करण यमगर राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ वाघमारे या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या