जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात घोषणाबाजी करून निषेध

25

🔸स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.1ऑगस्ट):-केंद्र सरकारने जिवनाश्यक वस्तूंचे भरमसाठ भाव वाढ तसेच पेट्रोल, डिझेल व गॅस चे भाव वाढवल्याने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करून देशात वाढलेल्या किंमती त्वरीत मागे घेण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांच्या नेतृत्वात आंदोलन व स्वाक्षरी मोहीम हाती घेतले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, अशोक हलामी सदस्य पं. स . धानोरा, माजी प स सदस्य परसराम पदा, कुलदीप इंदुरकर उपाध्यक्ष काँग्रेस धानोरा, माजी सभापती तथा महीला अध्यक्षा कल्पनाताई वड्डे, माजी सरपंच तथा महीला उपाध्यक्षा शेवंता ताई हलामी, लालाजी परसा, पस सदस्य महागु वाडगुरे, महेशभाऊ चिमुरकर, प्रशांतभाऊ कोराम, नामदेव जी नरोटे, संजय गावडे, शिवनाथ टेकाम, मिलिंद भाऊ कीरंगे, भूषण भाऊ भैसारे, कपिल जी कोवा, हरिरामजी धुर्वे, चंद्रभान जी नरोटे, सदारामजी गावडे, भुषण जी उंदीरवाडे, विनोद भाऊ कोरेटी, मनोहर जी कोराम, किशोर जी हलामी, देवाजी हलामी, गोमाजी नैताम, संतोष गावडे अनिल जी आतला, सुकराम कोवा, किशोर मडावी, रुपचंद गेडाम, ऋषीजी गुरूनुले, शेरखानजी पठान, गणेश जी दूगा, मुनीर जी शेख, शिवप्रसाद जी गवार्णा, बाबुराव जी नरोटे, नितीनजी किरंगे, नेताजी गुरनुले, अनिरुद्ध कुळमेथे, अभिजित जी मेश्राम, अक्षय रणदिवे, लोकेश नैताम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.