दिव्यांग तलाठी यांचा विविध ठिकाणी सत्कार

28

✒️मनोज नगरनाईक(खामगाव प्रतिनिधी)

खामगाव(दि.1ऑगस्ट):-मौजे पिंप्रीगवळी येथिल तलाठी (माऊली) ए. डि. डिवरे यांचा ग्रामपंचायत पिंप्रीगवळी तसेच गावकरी यांचे वतीने त 1 ऑगस्ट महसूल दिन 2021 ला जाहीर सत्कार करण्यात आला त्यांचे कार्य हे खरोखरच माऊली या नावाप्रमाणे आहे कोरोना काळातिल मदत असो वा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले यांनी मागिल काळात शालेय विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ फिल्टर जि.प. शाळेला स्वखर्चातुन बसवुन देऊन आपल्या मिळत असलेल्या सात बारा नोंदीची रक्कम अश्या पद्धतित खर्च केली गोर गरिब दिव्यांगांना किराणा किट देऊन त्यांनी याकाळातिल कोरोना वर मदतीसाठी स्वता पुढे राहले.

आज महसुल दिनाच्या माध्यमातुन तलाठी अर्जुन डिवरे माऊली दिव्यांग असलेले यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमा करीता सरपंच ,व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक, कृषिसहायक शाळेचे सर्व शिक्षक वृंद पोलीस ,ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी, कोतवाल व गावकरी मंडळी उपस्थित होते.तर खामगाव निधी बँकेच्यावतिने खामगाव शाखेमध्ये श्री भगवानराव बर्डे व त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातुन करत असलेली जनसेवा पाहुन त्यांचा सत्कार करण्यात आला