सुमेद्ध बोध्दी विहार येथे बोध्दी वृक्ष लावून केला वाढदिवस साजरा

36

✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823996466

उमरखेड(दि.4ऑगस्ट):- सुमेद्ध बोध्दी विहारात वर्षावासा निमित्य चालु असलेल्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन सुरू असुन त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम विहार समितीच्या वतीने राबविल्या जात आहेत.

विद्यार्थांमध्ये विहाराची गोडी भगवंताने दिलेला प्रज्ञा शिल करूणेचा संदेश विद्यार्थींमध्ये रूजावा याहेतूने विहारात अभ्यासिकेत अभ्यास करण्यास येणाऱ्या विद्यार्थी चि. तूषार याचा वाढदिवसा निमित्ताने भारतीय बौध्द महासभा शाखा उमरखेड तालुका व सुमेद्ध बोध्दी विहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय साध्या पध्दतीने अभिनव उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
आजकाल वाढदिवसानिमित्त भर रस्त्यावर केप कापून तो चेहऱ्याला फासुन, फटाक्यांची आतीषबाजी करणाऱ्या तरुणांकडे पाहता,पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू असल्याचे दिसुन येते.

मात्र स्वतःच्या वाढदिवशी भल्या पहाटे उठून विहाराची स्वच्छता करून वृक्षारोपण करणारे तरुण पाहता समाजाबद्दलची आत्मीयता, वृक्षसंर्वधनाचे महत्व, समाज सुधारण्याचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या पिढीचे आदर्श दर्शन घडले.

स्थानिक बोरबन येथील रहीवासी असलेले शारदाबाई केशवराव निथळे यांचे नातु चि.तुषार उर्फ भैरव याचा १५ वा वाढदिवस विहारात बोद्धी वृक्ष लावुन साजरा केला.

समाजकार्यात सदा अग्रसेर असलेले निथळे परीवारीतील चि. तुषार संतोष निथळे यांना विहार समितीचे अध्यक्ष प्रा.अनिल काळबांडे यांनी संविधान ग्रंथ भेट म्हणुन दिला. त्याच बरोबर भा.बौध्द महासभेचे ता,अध्यक्ष धम्मदिप काळबांडे यानी बुद्ध आणि त्याचा धम्म हे ग्रंथ भेट दिले.

व डॉ. प्रेम हनवते यांनी महत्मा जोतीबाराव फुले लिखित शेतकऱ्याचा आसुड हे पुस्तक भेट दिले वृक्षारोपण कार्यक्रमाला विहार समितीचे सर्व पदाअधिकारी व वृक्षसंर्वधन समितीचे कार्यकर्ते व महिला मंडळ हजर होते.तसेच भीम टायगर सेनेचे शहराध्यक्ष सिद्धर्थ दिवेकर यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.कार्यक्रमाची सांगता शेवटी धम्मबांधवाना व मित्र परिवारांना खिरदान वाटप करून झाली.