“सावित्रीच्या लेकींची ” एच.एस.सी.परीक्षेत उंच भरारी….

28

🔸आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० % निकाल

✒️भडगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भडगांव(दि.4ऑगस्ट):- 3 ऑगस्ट २०२१ मंगळवार रोजी एच.एस.सी.नाशिक बोर्डाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ , भडगांव संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी म्हणजेच *सावित्रीच्या लेकींनी* एच.एस.सी. परीक्षेत उंच भरारी घेऊन घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाचा निकाल *१००%* लागला.

*📚 विज्ञान विभाग 📚*

*प्रथम* लीना सुनील पाटील 556 (92.66%)

*द्वितीय* दर्शना विजय देवरे 549 (91.50%)

*तृतीय* नीलिमा संजय पाटील 540 (90.00%)

*📚 कला विभाग 📚*

*प्रथम* वृषाली युवराज भोई 521(86.83%)

*द्वितीय* नेहा विजय भोई 517 (86.16%)

*तृतीय* खुशी किरण वाघ 511 (85.16%)

सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष मा.एकनाथ गडबड महाजन, संस्थेचे मानद सचिव मा.दीपक संभाजी महाजन , सर्व सन्मानणीय संचालक मंडळ , विद्यालयाचे प्राचार्य मा.एस.पी.रोकडे सर, पर्यवेक्षक मा.व्ही.डी. महाजन सर व महाविद्यालयातील प्राध्यापक बंधु – भगिनी , शिक्षक बंधु -भगिनी व कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले व सर्व उत्तीर्ण विद्यार्थीनींना पुढील शैक्षणिक वाटचालीस मनस्वी शुभेच्छा दिल्या.