झिंबूळ झिंबूळस पानी येते : अम्दा कास्तकार मरते

44

▪️आयक गा सरकाराऽऽऽ…

(झाडी बोलीतील लेख)

आयक गा मायबाप सरकारा! आमच्या लाहानपणी एवळा डगर मोठा पानी याहाचा की बस, पुच्छो मत! आटाट रोज घराच्या बायेर पाय टाकण्याचा नाक नोहोता. जिकळं पाह्यला तिकळं नुस्ता चिखल न कांदर! टोगंरांटोंगरा पाय फसत, रस्त्यावं तरी!! आता तं सप्प्या गावच्या सळका चिकनचोपळ्या अन् मोट्या रट झाल्या. आतं तं बाप्पा, पान्याची आहारा वाट पाहारा वाट पाहावा लागते. आमच्याकळं मनवास हाये-

“आला तं काईच्या बाई,
नाय तं वं काईस नाई।।”

पूरबी मस्त पुरावं पुरं येहेत. दंडा डाबरीतले पारे धुरे तोळून फोळून घेऊन जाहेत. दंडात ढोबऱ्याच्या ढोबऱ्या गळदा पळत. पूर रोवन्याता कसा उगदून वागदून सपाचट करून टाकं. चिखल रोवनार वन्यारायचे हातपाय खाऊन टाकायचा, पन उगाच्या उगास गावातल्या गावात हिंडणारायचे सुद्दा पाय खायचा. तवा बिबा दाभनीत टोचून पेटत्या सिमणीवं धरत व तेल सांडाय लागल्यावं तो त्या खादल्या खांडूकावं चोबरत होते. आतं मंशील तं या बांदीचा पानी त्या बांदीत कदी जाहेस नाई. पूरबी सप्पेझण आपल्या दंडायच्या खांडी मोक्र्या करत. त्यासाठी मोठ्यानं झगळे झटू होयेत. तवा उगीस उगीस सांगून तरासवरास करत ते आयकवत-

“टाली का टुली बेसरम झाली।
मना का बोला पोटालं घाला।।”

अम्दा तिकळं तं कोटी कोटी मने भलतास पानी रिचवला कनं बाप्पा! गावावं कनं डोंगर घसरला. आठपंद्रा दिस कनं लोक पान्यातस हिलगून होते अन् आमच्या झाळप्या झाळीपट्टी गळचिरूली जिल्यात तं त्याचा पत्यास नाय. अबार तं वद्र मस्त कारा कारा ढूस मांडते, तइ अस्सा भेव लागते का नाय? मेलू का वाचलूस मनून..! काई इचारूस नोको? कदी कदी उंदिर मुतल्यावानी चुर्रूकंनी येते. नाय तं कोनाकं न् कोनाकं घसरून जाते तं माईत होत नाई. कदी कदी तं रे बाव्वा, रातंदिन थुवा थुवा पळते. माणसायच्या डोक्स्याच्या केसाइवं सालटा तरी नाय चवं. त्यालं कोटी पानी मनावा का गा? त्यादून तं ऊवाऱ्या- ऊवारबुचक्या माणसाइच्या केसाइत ऊवायचे आंडे कसे टकटक चवतेत. झाळीबोलीत मनवास हाये-

“झिंबूळ झिंबूळ पानी येते,
गोच्या नांगर धरते।
कुतरी आंबिल नेऊन देते,
एक ठेंगा मारते,
तं कॅईंग कॅईंग मंते!”

मज्जाक समजू नको रे राज्या! आमच्या इकळ्ल्या कास्तकारायची मोठीस फेदळोस हाये. काई लोकायनी तळे, बोळी, गळदा, गड्डेगुड्डे झोकझाक करून चिकटचाकट धानाचा रोवना केले. काइक झनायचे रोवने तं उभ्यानंच वारून झुरून मेले. मी तं माये वो, दोन एकऱ्या कास्तकार माज्याजोवळ नाय पान्याचा काई साधन! त्या बोवाऱ्या झाळुवान्या पान्याची वाट पाहून पाहून वागरेलू न थकलू गा! अस्सा जीवालं घोर लागला, खादला घाटा आंगालं लागत नाय का राती निजावा तं डोऱ्यालं डोरा लागत नाय. असा मनामंदी येते का कोटीतरी जीव देऊन मरून जावावा. पन नाय गो, मी मेल्यावं पोराबारायचा, ढोरावासरायचा, चिमण्या पाखरायचा लालनपालन कसा होयल? मनून थोळा दम धरलू आहू. तुमची का दादा, कुळ्चीवंच्या कुळचीवं मज्जाच हाये. मंतेत का-

“खाद्लू घेतलू झालू जळ,
नवऱ्या मालं कळ्या धर!”

आमच्याकळंही एकतरी डोरा राहू दे बा. अम्दा इकळं पानीपाऊस नाय पळला तं धान पिकनारस नाय. तवा पाया लागून हात जोळून मंतो, माज्या राज्या- मायबाप सरकारा थोळोसा आयक गा! आमच्या कास्तकारायलं भुक्या पोटी निजू नोको देऊ गाऽऽऽ..!

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार आनंदी गोविंदा निकोडे(अल्पभुधारक एक शेतकरी पुत्र.)मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी,ता. आरमोरी, जि. गडचिरोली.व्हा. नं.७४१४९८३३३९.