खेड पंचायत समितीच्या सभापती विरोधात १८ जुलै रोजी फेरमतदान

83

✒️विशेष प्रतिनिधी(श्री.मनोहर गोरगल्ले(राजगुरुनगर -खेड)मो:-९७६७२१४६३४

राजगुरुनगर(दि.5ऑगस्ट):–खेड- राज्यात गाजत असलेले राष्ट्वादी व शिवसेनेतील वादामुळे राज्यभर गाजलेल्या राजगुरुनगर (ता.खेड जि.पुणे)पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापती विरोधात विरोधी सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर १८ आॕगष्ट रोजी फेर मतदान घेण्यात येनार आहे.जिल्हाधिकारी मा.राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार दुसर्यांदा होणाऱ्या या मतदानाकडे तालुक्यातील नागरीकांचे तसेच राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहीले आहे.

खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात त्याच्या पक्षातील सहा व राष्ट्वादी काॕंग्रेस व भाजपचे पाच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करुन त्यावर ३१मे रोजी मतदान झाले होते. या प्रक्रियेला सभापती भगवान पोखरकर ,माजी उपसभापती अमोल पवार आणि ज्योती आरगडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा ठराव २७ जुलै रोजी रद्दबादल ठरविला व त्यावर पुन्हा १८ आॕगष्ट रोजी फेर मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत .