बीडची प्रतिभा चमकली रुपेरी पडद्यावर

27

🔹माझ्या विद्यार्थींनीचा मला सार्थ अभिमान – राजेंद्र लाड

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

बीड(दि.9ऑगस्ट):- पोलिस दलातील महिला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणारी कु.प्रतिभा बबन सांगळे ही ‘आझादी के रंग’ या शॉर्ट फिल्ममध्ये झळकली आहे.स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुणे येथील प्रसिध्द लेखिका,निर्मात्या,दिग्दर्शक सोनी विरदी यांनी या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे.दि.१३ ऑगस्ट २०२१ रोजी ‘आझादी के रंग’ संपूर्ण देशभरात प्रदर्शित होत आहे.या शॉर्टफिल्ममध्ये बीड पोलिस दलात कार्यरत असणारी महिला पोलिस कर्मचारी कु.प्रतिभा सांगळे हिने महत्वपूर्ण अशी मध्यवर्ती भूमिका सादर केली आहे.

कु.प्रतिभा ही मुळची आष्टी तालुक्यातील मातावळी येथील रहिवाशी असून मागील बऱ्याच वर्षापासून बीड पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे.कु.प्रतिभा हिला जि.प.प्रा.शा.मातावळी,ता.आष्टी,जि.बीड येथील प्राथमिक शाळेत शिक्षणाचे धडे दै.रयतेचा कैवारी बीड जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र लाड यांनी दिलेले आहेत.लहानपणापासून कु.प्रतिभा ही आदर्श कलाकार व धाडसी मुलगी आहे.असे राजेंद्र लाड यांनी सांगितले.तिची कलाक्षेत्रात असणारी आवड तिने कामाच्या धावपळीतही जोपासली आहे.आपल्यातील कलागुणांना तिने विविध मॉडलिंग स्पर्धा,फोटो शूट तसेच शॉर्ट
फिल्मच्या माध्यमातून जतन केले आहे.

तसेच कु.प्रतिभा सांगळे
ही एक उत्कृष्ठ अशी रेसलर आहे.राज्य पातळीवर तिने रेसलिंगच्या स्पर्धा गाजवल्या आहेत.आपल्या अभिनय क्षमतेच्या जोरावर बीडसारख्या भागातून रूपेरी पडद्यापर्यंतची मजल मारण्याचे काम प्रतिभाने केले आहे.
येणाऱ्या आगामी काळात नामांकित अशा दिग्दर्शक,निर्माते यांच्या येणाऱ्या हिंदी,मराठी वेबसिरीज,प्रसिध्द गायक यांचे व्हिडीओ अल्बम साँग यामध्येही ती झळकणार आहे.हे सर्व करत असताना तिने आपल्या पोलिस खात्यातील कर्तव्याला प्रथम प्राधान्य देऊन जोडीला आपली कलाक्षेत्राची आवड जोपासली आहे.कु.प्रतिभा बबन सांगळे हिने रूपेरी पडद्यापर्यंत मारलेल्या मजलीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.भविष्यात कलाक्षेत्रात उत्तमोत्तम काम करून बीड जिल्ह्याचे नाव अधिक उंचवावे अशी सदिच्छा तिच्या असंख्य चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.तिला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.